Cyber Security Apps:- सध्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाने शिरकाव केला असून आपल्या हातातील मोबाईल तसेच लॅपटॉप यांच्या वापराच्या माध्यमातून आपल्याला या तंत्रज्ञानाचा अनुभव घेता येतो. आपल्याला माहित आहे की तुम्ही आता अशा अनेक गोष्टी आहेत की ते एका क्लिकवर घरी बसून करू शकतात.
अशाप्रकारे तंत्रज्ञानामुळे अनेक गोष्टी तशा सोप्या झाल्या तशा काही गोष्टी मानसिक त्रास देणाऱ्या देखील ठरताना दिसून येत आहे. कारण या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये अनेक सायबर भामटे देखील मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाल्याची स्थिती असून एखाद्या एसएमएस किंवा लिंक किंवा इतर पद्धतींचा वापर करून तुमचे बँक खाते रिकामी करण्यामागे या सायबर भामट्यांचा हात असतो.
त्यामुळे अशा सायबर घोटाळ्यापासून किंवा सायबर फसवणुकीपासून स्वतःचा बचाव करता यावा याकरिता सरकार देखील त्यांच्या स्तरावर अनेक पावले उचलत असते व या पावलांचा एक भाग म्हणून अनेक एप्लीकेशन देखील लाँच करत असते.
उदाहरणच घ्यायचे झाले तर सरकारच्या माध्यमातून चक्षु पोर्टल अलीकडच्या कालावधीमध्ये लॉन्च करण्यात आलेले आहे. या पोर्टलच्या मदतीने सायबर गुन्ह्यांमध्ये आणि आर्थिक फसवणुकीमध्ये एखाद्या स्मार्ट गॅजेटचा गैरवापर रोखणे शक्य झाले आहे.
हा व इतर अनेक फायदे या चक्षु पोर्टलचे आहेत. या एप्लीकेशनच्या माध्यमातून जर तुम्हाला फसवणुकीच्या हेतूने एखादा कॉल किंवा एसएमएस किंवा व्हाट्सअप मेसेज आला तर तुम्ही पोर्टलवर तक्रार नोंदवू शकतात. या चक्षु पोर्टल शिवाय अन्य काही एप्लीकेशन देखील असून ते सायबर फसवणुकीपासून आपला बचाव करू शकता.
हे एप्लीकेशन करतील सायबर फसवणुकीपासून बचाव
1-M-Kavach 2- हे एप्लीकेशन भारत सरकारच्या माध्यमातून लॉन्च करण्यात आलेले असून याच्या मदतीने स्कॅम एप्लीकेशन शोधण्यास मदत होते. हे ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईल मधील इतर ॲप्लिकेशन स्कॅन करते आणि त्यांचा शोध घेते.
तसेच मोबाईलमध्ये असलेले गुपित एप्लीकेशन शोधण्यात आणि ते हटवण्यामध्ये देखील हे ॲप्लिकेशन मदत करते. या एप्लीकेशनचे वैशिष्ट्य म्हणजे हे लॉक सिस्टमसह येते.
याचा वापर करून तुम्ही तुमचे बँकिंग ॲप्स, पेमेंट ॲप्स किंवा सोशल साईट सारखे महत्त्वाचे एप्लीकेशन लॉक करू शकतात. हे ॲप्लिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करता येऊ शकते.
2-e Scan- या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर मदत होते. समजा तुम्ही एखाद्या चुकीच्या किंवा स्पॅमसाईटला भेट दिली तर हे ॲप्लिकेशन तुम्हाला लगेच त्यासंबंधीची चेतावणी देते. तसेच तुमच्या फोनमध्ये कोणत्याही प्रकारचा व्हायरस आहे की नाही हे तपासून घेण्यासाठी
किंवा जाणून घेण्याकरिता हे एप्लीकेशन फोन स्कॅन करण्यास सक्षम असते व त्यासंबंधीची माहिती आपल्याला लागलीच मिळते. हे एप्लीकेशन देखील तुम्ही गुगल प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करू शकतात.
3- Safe me- हा एक असा प्लॅटफॉर्म आहे की ज्या मदतीने तुम्ही स्वतःच्या सायबर सुरक्षेबाबत तुमच्या ज्ञानात भर टाकू शकतात. या एप्लीकेशनवर या संबंधीचे अनेक व्हिडिओ असतात व त्या ठिकाणी शिकण्याचे अनेक पर्याय देखील उपलब्ध असतात.
त्यामुळे सायबर सुरक्षा बाबत अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला या ठिकाणी मिळतात. या एप्लीकेशनमध्ये पासवर्ड प्रोटेक्शन पासून ते चॅट सपोर्ट सारख्या अनेक उत्तम अशा फीचर्सचा समावेश आहे.
4- सायवेअर सोशल– हे ॲप्लीकेशन देखील खूप महत्त्वाचे असून यावर जगातील सायबर सुरक्षा शी संबंधित असलेल्या महत्त्वाच्या बाबी आणि घटना यांची माहिती दिलेली आहे. या ॲप्लिकेशनवर तुम्हाला सायबर सुरक्षेशी संबंधित अनेक प्रकारचे कंटेंट वाचायला मिळतात.
तसेच अनेक तज्ञांच्या मतांचा देखील समावेश या अँप्लिकेशन वर करण्यात आलेला आहे. याशिवाय तुम्हाला या एप्लीकेशन वर चोरी आणि फसवणूक यासारख्या विविध श्रेणीचे विभाग पाहायला मिळतात. अशा अर्थाने तुम्ही या ॲप्लिकेशनच्या मदतीने तुमचे सायबर सुरक्षेचे संबंधित ज्ञान वाढवू शकता.
5- सायबर सिक्युरिटी क्विझ– हे एप्लीकेशन देखील खूप महत्त्वाचे असून या माध्यमातून ऑनलाईन फसवणूक आणि सायबर सुरक्षा बद्दल तुम्हाला बरेच ज्ञान प्राप्त होते. या माध्यमातून तुम्हाला उत्तम युजर इंटरफेस सोबत अनेक प्रकारचे प्रश्न उत्तरे पाहायला मिळतात.