उन्हाळ्यामध्ये फ्रीजला 1 ते 2 तास बंद ठेवले तर फायदा होतो की नुकसान? फ्रिज जर सतत चालू ठेवले तर होते का खराब? वाचा माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये जेव्हा सगळीकडे प्रचंड प्रमाणात उष्णता असते तेव्हा साहजिकच या उष्णतेपासून वाचण्यासाठी किंवा दिलासा मिळावा यासाठी अनेक विद्युत उपकरणाचा वापर हा घरांमध्ये वाढतो. या उपकरणांमध्ये  प्रामुख्याने घरात कुलर, पंखे, एसी आणि फ्रिज  यासारखे उपकरणे मोठ्या प्रमाणावर वापरले जातात.

तसेच बरेच उपकरणे आपण सतत चालू ठेवतो. परंतु बऱ्याचदा आपण फॅन, एअर कंडिशनर सारखे उपकरणामध्ये काही कालावधी करिता बंद करतो. परंतु फ्रिजच्या बाबतीत असे होताना दिसून येत नाही. कारण फ्रिज हा सतत चालू असतो. कारण आपण यामध्ये काही खाद्यपदार्थ ठेवत असतो व ते उन्हाळ्यामध्ये खराब होऊ नयेत याकरिता त्याचा वापर होतो हे आपल्याला माहिती आहे.

फ्रिजला जोपर्यंत विजेचा पुरवठा होत असतो तोपर्यंत त्याचा कॉम्प्रेसर हा काम करत असतो व जेव्हा कॉम्प्रेसर काम करतो तेव्हाच फ्रीजमध्ये थंडावा राहत असतो. एवढेच नाही तर आपण फ्रीज बंद केला तरी देखील तो बराच कालावधीपर्यंत थंड राहतो व त्यामुळे खाद्यपदार्थ खराब होत नाही. परंतु अशाप्रकारे सतत फ्रिज चालू ठेवल्यामुळे ते खराब होऊ शकते का किंवा त्याचे काही नुकसान होऊ शकते का? हा प्रश्न बऱ्याचदा आपल्या मनामध्ये येतो. त्याच प्रश्नाचे उत्तर या लेखात आपण बघू.

 फ्रिजला किती कालावधीपर्यंत सुरू ठेवू शकतो?

जर आपण फ्रिजचे महत्वाचे काम पाहिले तर दिवसाचे 24 तासापर्यंत अन्न ताजे ठेवणे हे आहे व त्याकरिता फ्रीज 24 तास चालू ठेवण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे फ्रिज बनवणाऱ्या कंपन्या फ्रिज 24 तास सतत चालू राहावा व नुकसान होऊ नये अशा प्रकारे त्याला डिझाईन करत असतात. म्हणजेच तुम्ही फ्रीजला सतत चालू जरी ठेवले तरी त्याचे कोणतेही नुकसान होत नाही.

महत्वाचे म्हणजे तुम्ही संपूर्ण एक वर्षभर जरी फ्रीज बंद केला नाही तरी देखील त्यामध्ये कुठल्याही प्रकारची समस्या उद्भवत नाही. परंतु दिवसातील काही तास जर फ्रीज बंद केला तर आपण विजेची बचत करू शकतो का? हा देखील एक मोठा प्रश्न आहे. परंतु जर तुम्ही दिवसातून काही कालावधी करिता फ्रीज बंद केला तर त्यापासून फायदा कमी परंतु तोटा जास्त होण्याची शक्यता असते.

 फ्रिज जर एक ते दोन तास बंद ठेवले तर काय होते?

समजा तुम्ही एका दिवसामध्ये बऱ्याचदा फ्रीज चालू-बंद केला किंवा दिवसातून एक ते दोन तास बंद ठेवला तर तो योग्य प्रकारे कुलिंग देण्यास असमर्थ ठरतो.म्हणजेच तो थंडावा देऊ शकत नाही. त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवलेले जे काही खाद्यपदार्थ असतात ते खराब होण्याची शक्यता वाढते.

तसेच एक ते दोन तास फ्रीज बंद ठेवून तुम्ही विजेची बचत होईल असा विचार करत असाल तर तो विचार चुकीचा आहे. जर तुम्ही असे केले तर फ्रीज चालू केल्यानंतर त्याला पुन्हा पहिल्यापासून कंप्रेसर सुरू करावा लागतो व अधिकची ऊर्जा खर्च होऊन विज बिल जास्त येण्याचा धोका संभवतो.

त्यामुळे फ्रिज सतत चालू ठेवला तरी त्यामध्ये काही बिघाड होत नाही हे कधीही लक्षात ठेवावे. विशेष म्हणजे रेफ्रिजरेटर हा आपोआपच वीज वाचवण्यासाठी सक्षम आहे व त्या दृष्टिकोनातून त्याची रचना करण्यात आलेली आहे.

आज-काल बऱ्याच फ्रीजमध्ये वीज बचतीसाठी आवश्यक असणारे ऑटोकट फिचर देण्यात आलेले आहे. म्हणजेच ठराविक तापमानापर्यंत फ्रिज मधील वातावरण थंड झाल्यावर तो अधिक ऊर्जा वापरणे ऑटोमॅटिक थांबवतो व कंप्रेसर देखील काम करणे थांबवतो व त्यामुळे विजेची बचत होते.