Iphone 15 Series:ॲपल15 मध्ये गर्दीचा आवाज करता येईल म्युट आणि बोलता येईल आरामशीर! वाचा या फोनची वैशिष्ट्ये आणि किंमत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Iphone 15 Series:- ॲपल ही कंपनी अनेक प्रकारच्या गॅझेट निर्मितीच्या बाबतीत जगविख्यात असून मंगळवारी रात्री या कंपनीने दोन नवीन सर्वोत्तम अशा दोन उत्पादनांची लॉन्चिंग केली. दीड तासांचा इव्हेंट सादर करण्यात आला व यामध्ये आयफोन 15 सिरीजचे चार स्मार्टफोन लॉन्च करण्यात आले व यामध्ये ॲपलने आयफोन एअरपॉड करिता युएसबी सी सुविधा देखील अवलंब यामध्ये केलेला आहे.

विशेष म्हणजे या सर्व मोबाईल चार्ज करण्यासाठी एकाच चार्जर चा वापर करण्यात येणार आहे. अनेक प्रकारची आधुनिक वैशिष्ट्ये या आयफोन मध्ये देण्यात आलेली असून रोड साईड असिस्टंटची सुविधा देखील सॅटॅलाइटच्या माध्यमातून या फोनमध्ये मिळणार आहे.

 आयफोन 15 सिरीजची वैशिष्ट्ये

यामध्ये जेव्हा कॉल चालू असेल व गर्दीचे ठिकाण असेल तर तुम्हाला गर्दीचा गोंधळ किंवा गोंगाट म्युट करता येणे शक्य होणार आहे. म्हणजे कितीही गर्दी राहिली तरी व्यक्ती कॉलवर असताना तो गोंगाट ऐकू येणार नाही. एवढेच नाही तर यामध्ये मशीन लर्निंग च्या साह्याने ऑटोमॅटिक पोट्रेट फोटो देखील काढता येणे शक्य होणार आहे. त्यामध्ये संपूर्ण वायरलेस तंत्रज्ञान वापरण्यात आले असून याच्या मदतीने आयफोन वापरणारे मित्र व आपण एकाच भागात असू तेव्हा त्यांच्यापर्यंत पोहोचणे शक्य होणार आहे.

या आयफोनची स्क्रीन ही सिरॅमिक ग्लास शिल्डने सुसज्ज करण्यात आलेली आहे व ती खूप मजबूत आहे. एप्पल च्या 15 या सिरीज मध्ये आयफोन 15 प्रो आणि 15 प्रो मॅक्समध्ये टायटॅनियम बॉडीचा वापर करण्यात आलेला आहे. इतकंच नाही तर या आयफोनमध्ये एचडी क्वालिटीचा व्हिडिओ रेकॉर्ड देखील करता येणे शक्य होणार आहे.

 आयफोन पंधरा सिरीज मधील फोनची किंमत

1- आयफोन 15- 28 जीबी स्टोरेज क्षमता असलेल्या आयफोनची किंमत 79 हजार 900 रुपये, 56 जीबी स्टोरेज क्षमता असलेल्या आय फोनची किंमत 89 हजार 900 रुपये आणि 512 जीबी आयफोनची किंमत एक लाख 99 हजार 900 रुपये असणार आहे.

2- आयफोन 15 प्लस 28 जीबी स्टोरेज क्षमता असलेल्या फोनची किंमत 89 हजार 900 रुपये, 56 जीबी स्टोरेज क्षमता असलेल्या आयफोनची किंमत 99900 रुपये तर 512 जीबी स्टोरेज क्षमता असलेल्या आयफोन 15 प्लसची किंमत एक लाख एकोणीस हजार नऊशे रुपये असणार आहे.

3- आयफोन 15 प्रो यामध्ये 28 जीबी स्टोरेज क्षमता असलेले आयफोनची किंमत एक लाख 34 हजार 900 रुपये, 512 जीबी  स्टोरेज क्षमता असलेल्या आयफोनची किंमत एक लाख 64 हजार 900 रुपये, 1 टीबी स्टोरेज क्षमता असलेल्या आयफोन 15 प्रो ची किंमत एक लाख 84 हजार 900 रुपये असणार आहे.

4- आयफोन 15 प्रो मॅक्स 56 जीबी स्टोरेज क्षमता असलेले आयफोन ची किंमत एक लाख 59 हजार 900 रुपये, 512 जीबी स्टोरेज क्षमता असलेल्या आयफोनची किंमत एक लाख 79 हजार 900 रुपये तर 1 टीबी स्टोरेज क्षमता असलेल्या आयफोनची किंमत एक लाख 99 हजार 900 रुपये असणार आहे.