सध्याचे युग हे स्मार्टफोनचे युग असून मोठ्या प्रमाणावर अनेक स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांकडून वेगवेगळे वैशिष्ट्ये आणि किंमत असलेले स्मार्टफोन बाजारपेठेत लॉन्च करण्यात येत आहेत. ज्याप्रमाणे स्मार्टफोनमध्ये जास्तीत जास्त वैशिष्ट्ये आणि फीचर्स असतात त्याप्रमाणे त्याची किंमत ही ठरत असते.
आपल्याला माहित आहे की स्मार्टफोनच्या किमती या काही हजारापासून तर काही लाखापर्यंत देखील आहेत. ग्राहक त्यांचा आर्थिक बजेट आणि सोयीनुसार स्मार्टफोनची खरेदी करतात.
या स्मार्टफोनच्या युगामध्ये आता कीपॅड फीचर असलेले छोटे फोन मात्र काळाच्या ओघात मागे पडल्याचे चित्र आहे. परंतु स्मार्टफोनच्या या स्पर्धेमध्ये itel या मोबाईल उत्पादक कंपनीने मात्र एक कीपॅड फीचर असलेला नवीन फोन लॉन्च केला असून त्यामध्ये अनेक फीचर्स ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
itel ने लॉन्च केला सुपर गुरु 4G फोन
मोबाईल उत्पादक कंपनी असलेल्या itel ने आपला नवीन फोन लॉन्च केला असून या फोनची किंमत दोन हजार रुपये पेक्षा कमी ठेवण्यात आलेली आहे. हा 4G फिचर फोन असून याचे नाव कंपनीने आयटेल सुपर गुरु 4G असे ठेवले असून नुकताच हा फोन लाँच करण्यात आलेला आहे.
या फोनमध्ये अनेक वैशिष्ट्ये देण्यात आलेले आहेत. जसे की, तुम्ही यामध्ये युट्युब आणि यूपीआय सारखे फीचर्स देखील वापरू शकतात.दुसरे महत्त्वाचे म्हणजे यामध्ये तुम्ही तुम्हाला हव्या त्या भाषेची निवड करू शकतात. कारण या फोनमध्ये तुम्हाला तेरा भाषांचा सपोर्ट देण्यात आलेला आहे.
तसेच यामध्ये उत्तम प्रतिचा कॅमेरा देखील देण्यात आला असून कंपनीने हा कीपॅड फिचर फोन 1799 रुपये किमतीत लॉन्च केला आहे. तसेच हा डार्क ब्ल्यू, ग्रीन आणि ब्लॅक अशा तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. तुम्हाला जर हा फोन खरेदी करायचा असेल तर तुम्ही itel कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन किंवा ॲमेझॉन वरून खरेदी करू शकतात.
या फोनची महत्त्वाचे वैशिष्ट्ये
तसेच या कीपॅड फीचर फोनमध्ये दोन इंचाचा डिस्प्ले देण्यात आला असून डिवाइसला पावर देण्याकरिता 1000mAh बॅटरी देण्यात आली आहे व हा फोन VGA कॅमेरासह येतो व या कॅमेराच्या मदतीने तुम्ही यूपीआय स्कॅन करून पेमेंट देखील करू शकतात. तसेच महत्त्वाचे म्हणजे या छोट्या फोन मध्ये youtube प्लेबॅक सपोर्ट उपलब्ध आहे
एवढेच नाही तर युजर्स या फोनच्या माध्यमातून youtube शॉर्ट्स स्ट्रीम करू शकतात. तसेच यामध्ये सोकोबँन,2048 आणि टेट्रीस सारखे गेम देखील उपलब्ध आहेत. हा फोन इन्स्टंट मेसेजिंग ॲप LetsChat चा सपोर्ट आहे. तसेच या कीपॅड फिचर फोनमध्ये ड्युअल 4G कनेक्टिव्हिटी आणि VoLTE सपोर्ट देखील उपलब्ध आहे. एवढेच नाहीतर हा फोन 2G आणि 3G सपोर्टसह देखील येतो.