रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी आता नाही कॉन्ट्रॅक्टरची गरज, रस्तेच बुजवतील खड्डे! वाचा NHAI कोणते आणत आहे जादुई तंत्रज्ञान?

Ajay Patil
Published:
holes on road

रस्त्यांवर पडलेले खड्डे प्रत्येक वर्षी येणारे मोठे समस्या असून प्रशासन पावसाळा सुरु अगोदर खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेते. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणावर अपघात होतात व कित्येक लोकांना आपला अनमोल असा जीव गमवावा लागतो. जर आपण अपघातांच्या दृष्टिकोनातून महामार्ग मंत्रालयाच्या आकडेवारी पाहिली तर असे दिसून येते की, 2022 मध्ये खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांमध्ये 22.6 टक्क्यांनी वाढ झाली.

2021 मध्ये 3625 अपघात झाले होते तर 2022 मध्ये 4446 अपघात खड्ड्यांमुळे झाले या अपघातांमध्ये 1800 पेक्षा जास्त लोकांना जीव गमवावा लागला.त्यामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न बऱ्याचदा उग्र स्वरूप धारण करतो. काही मोठी घटना घडली की तेव्हा सरकारला जाग येते व खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेण्यात येते.

परंतु ही प्रक्रिया देखील खूप मोठी असते. यामध्ये एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला यासंबंधीचे कंत्राट दिले जाते व नंतर खड्डे दुरुस्तीचे काम सुरू होते व एवढेच नाही तर या पूर्ण प्रक्रियेला अनेक महिने देखील लागू शकतात. या रस्त्यांवरील खड्ड्याची जी काही समस्या आहे ती मिटवण्यासाठी

आता एनएचएआय अर्थात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने एक अनोखे तंत्रज्ञान शोधून काढले असून त्या माध्यमातून आता रस्त्यांवर खड्डे पडले तर ते ऑटोमॅटिक दुरुस्त केले जातील. आता हे ऐकल्यावर किंवा वाचल्यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. परंतु या प्रकारचे तंत्रज्ञान आता भारतीय रस्त्यांवर लवकरच पाहायला मिळेल.

  राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने काय सांगितले?

याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने म्हटले की, रस्त्यांमध्ये स्वयं उपचार तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी डांबराचा एक नवीन प्रकार वापरला जाईल व या तंत्रज्ञानाचा वापर जेव्हा रस्ता तयार केला जाईल तेव्हाच केला जाईल. त्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यांची समस्या टाळता यायला मदत होईल.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे या तंत्रज्ञानाचा वापर जो रस्ता तयार करताना केलेला असेल मुळात तो रस्ता लवकर खराब होणार नाही. जर एखाद्या ठिकाणी लहान भेग रस्त्यावर दिसल्या तरी त्या ऑटोमॅटिक बऱ्या होतील व मोठे खड्डे त्यापासून निर्माण होणार नाहीत.

या तंत्रज्ञानाच्या मदतीने रस्ते लवकर खराब होणार नाहीत व त्यामुळे त्यांना पुन्हा पुन्हा दुरुस्ती करण्यासाठी जो काही खर्च करावा लागतो तो देखील वाचणार असल्याने पैशांची देखील बचत होईल.

 कसे काम करेल हे तंत्रज्ञान?

याबाबत माहिती देताना एनएचएआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, जेव्हा रस्ता तयार केला जाईल तेव्हा त्यामध्ये पातळ स्टीलचे तंतू टाकले जातील व ज्यामध्ये बिटूमेन हा जो काही डांबराचा प्रकार आहे त्याचा वापर केला जाईल. रस्त्यावर जर काही भेग पडली

किंवा काही क्रॅक झाले तर लागलीच हा बिटूमीन गरम होईल आणि तो विस्तारायला सुरुवात करेल म्हणजेच त्याच्या आकारात वाढ होईल व ते पुन्हा काँक्रीट सह एकत्र येईल आणि स्टीलच्या धाग्यांना जोडेल. ज्याच्या एकंदरीत प्रक्रियेमुळे रस्त्यांवर खड्डे पडणार नाहीत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe