8 A Utara: ‘या’ पायऱ्यांचा वापर करा आणि घरबसल्या काढा तुमच्या जमिनीचा खाते उतारा! वाचा स्टेप बाय स्टेप पद्धत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

8 A Utara:- जमिनीच्या बाबतीत सातबारा आणि खाते उतारा हे खूप महत्त्वाचे कागदपत्रे असून या दोन्ही कागदपत्रावरून संबंधित जमिनीची मालकी किंवा वहिवाट आपल्याला कळते. तसेच एखादी जमीन अनेक वेगवेगळ्या गट क्रमांक मध्ये विभागलेल्या असतात व या सगळ्या गट क्रमांक मधील शेत जमिनीची एकत्रितपणे माहिती ही आपल्याला खाते उताराच्या माध्यमातून मिळते.कारण खाते उताऱ्यावर ही सगळी माहिती नोंद केलेली असते.

सातबारा उतारा असो की खाते उतारा हे कागदपत्रे काढण्यासाठी आपल्याला अगोदर तलाठी कार्यालयामध्ये जावे लागत होते. परंतु आता शासनाच्या माध्यमातून डिजिटल स्वाक्षरी चा 8अ म्हणजेच खाते उतारा ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून दिल्यामुळे आता तलाठी कार्यालयात जाण्याची गरज भासत नाही.

महत्वाचे म्हणजे डिजिटल स्वाक्षरीत असलेला सातबारा उतारा किंवा आठ चा उतारा आता सर्व शासकीय व कायदेशीर कामांसाठी वैध आहे. म्हणजेच आपण आता पीक कर्ज असो किंवा पिक विमा किंवा शेती संबंधित इतर महत्त्वाच्या सरकारी कामांसाठी अशा प्रकारचा आठ अ अर्थात खाते उतारा किंवा सातबारा उतारा वापरू शकतो. त्यामुळे या लेखात आपण नेमका ऑनलाइन पद्धतीने आठ अ चा उतारा म्हणजेच खाते उतारा कसा काढावा? त्याबद्दलची माहिती घेऊ.

 अगोदर रजिस्ट्रेशन अर्थात नोंदणी केली नसेल तर असे करा

1- याकरिता तुम्हाला सगळ्यात अगोदर गुगल वर जाऊन त्या ठिकाणी bhulekh.mahabhumi.gov.in असं सर्च करावे लागेल व त्यानंतर तुमच्यासमोर महसूल विभागाची एक साईट ओपन होते.

2- त्यानंतर ओपन झालेल्या या साइटवर उजव्या बाजूला तुम्हाला डिजिटल साईन्ड सातबारा किंवा डिजिटल स्वाक्षरी सातबारा पाहण्यासाठी इथे क्लिक करा असा पर्याय दिसेल.

3- या ठिकाणी क्लिक केल्यावर परत एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होते. या पेजवर तुम्ही डिजिटल स्वाक्षरीतला सातबारा 8 अ चा उतारा डाऊनलोड करू शकतात.

4- त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन म्हणजेच नोंदणी करण्याकरता सगळ्यात अगोदर न्यू युजर रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

5- त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन फॉर्म ओपन होतो व यामध्ये सुरुवातीला तुम्हाला तुमची सगळी वैयक्तिक माहिती भरायची आहे. वैयक्तिक माहिती मध्ये तुम्हाला तुमचे नाव, तुमचे जेंडर तसंच नॅशनॅलिटी म्हणजेच राष्ट्रीयत्व व मोबाईल नंबर द्यायचा आहे. त्यानंतर ऑक्युपेशन म्हणजेच व्यवसाय या कॉलम मध्ये तुम्ही काय काम करता हे नोंदवायचं आहे. म्हणजेच तुम्ही बिझनेस किंवा सर्विस व यापैकी नसेल तर ऑदर म्हणजेच यापैकी वेगळे या ठिकाणी टिक करू शकतात व त्यानंतर तुम्हाला तुमचा मेल आयडी आणि जन्मतारीख लिहायचे आहे.

6- अशाप्रकारे तुम्ही तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन भरल्यानंतर तुमच्या पत्त्याची माहिती तुम्हाला द्यायची आहे. यामध्ये तुम्हाला तुमच्या घराचा क्रमांक तसेच बिल्डिंगमध्ये राहत असाल तर कोणत्या फ्लोअरला म्हणजेच कोणत्या मजल्यावर राहतात ते आणि बिल्डिंग चे नाव इत्यादी त्या ठिकाणी नमूद करायचे आहे त्यानंतर पिनकोड टाकून आपसूकच तुमचा जिल्हा आणि राज्याचे नाव त्या फॉर्मवर येऊन जाते. त्यानंतर तुम्ही राहत असलेल्या गल्लीचे व गावाचे नाव तसेच तालुक्याचे नाव देखील टाकायचे आहे.

7- अशाप्रकारे सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला लॉगिन आयडी तयार करायचा आहे व लॉगिन आयडी तयार केल्यानंतर तो टाकून चेक अवेलेबिलिटी या पर्यायावर क्लिक करून तो आयडी ऑलरेडी अस्तित्वात आहे किंवा नाही हे तुम्हाला बघायचं आहे. जर आयडी उपलब्ध नसेल तर तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे. नंतर चार ते पाच प्रश्न असतात त्यांचे उत्तर तुम्हाला द्यायचे आहेत व त्यानंतर कॅपच्या टाईप करायचा आहे.

8- ही प्रोसेस झाल्यानंतर शेवटी सबमिट बटनावर क्लिक करायचा आहे व नंतर तुमच्या स्क्रीनवर तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण झाले असा संदेश येतो व त्यानंतर क्लिक हीअर या पर्यायावर क्लिक करायचा आहे.

 नोंदणी नंतर अशा पद्धतीने काढा 8 अचा उतारा

1- आता रजिस्ट्रेशन करताना तुम्ही टाकलेली युजरनेम आणि पासवर्ड वापरून तुम्हाला लॉगिन करायचे आहे.

2- लॉगिन केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होते व या पेजवर डिजिटली साईन्ड 8 अ असा पर्याय तुम्हाला दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर डिजिटल स्वाक्षरीत 8  असं शीर्षक असलेले पेज तुमच्यासमोर ओपन होते.

3- त्यानंतर तुम्हाला खाली उताऱ्याकरिता पंधरा रुपये शुल्क आकारला जाईल आणि ते तुमच्या बॅलन्स मधून कापले जाईल अशा प्रकारचे सूचना दिसते.

4- तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन केलेले असल्यामुळे आपल्या खात्यात इथं काही बॅलन्स एखाद्या वेळेस नसतो. त्यामुळे सगळ्यात आधी तुमच्या खात्यात पैसा जमा करणे गरजेचे असते. त्याकरिता खाली असलेल्या रिचार्ज अकाउंट या पर्यायावर तुम्हाला क्लिक करावे लागेल.

5- नंतर तुम्हाला पंधरा रुपये इतकी रक्कम टाकून पे नाऊ या पर्यावर क्लिक करायचा आहे आणि कन्फर्म या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

6- त्यानंतर तुमचे पैसे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग या माध्यमातून तुम्ही जमा करू शकतात.

7- त्यानंतर तुम्ही डिजिटल आठच्या फॉर्मवर परत गेले तर तिथे तुम्हाला पंधरा रुपये तुमच्या खात्यात जमा झाल्याची दिसेल.

8- त्यानंतर डिजिटल सही चा आठ अ उतारा मिळवण्यासाठी तुम्हाला फार्म विचारलेली माहिती भरणे गरजेचे आहे व यामध्ये जिल्ह्याचे, तालुका आणि गावाचे नाव निवडायचा आहे व सर्वे किंवा गट नंबर, तुमचे पहिले, मधले किंवा शेवटचे नाव यापैकी काही एक माहिती टाकायची आहे.

9- त्यानंतर तुमच्यासमोर डिजिटल स्वाक्षरी चा 8अ चा उतारा ओपन होतो. उताऱ्यावर तुम्हाला डिजिटली साईन्ड या पर्यायावर मोठ्या आकारात बरोबरची खूण केलेली दिसते व या खुणाचा अर्थ होतो की हा  डिजिटल स्वाक्षरीत तयार झालेला उतारा आहे.

अशा पद्धतीने तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने तुमचा खाते उतारा काढू शकता.