Onion Cultivation: आता शेतकऱ्यांना बियाण्यासाठी बेडवर कांदा लावणे होईल सोपे! आयसीएआरने विकसित केले अत्याधुनिक कांदा लागवड यंत्र

Ajay Patil
Published:
onion cultivation machine

Onion Cultivation:- कांदा हे पीक महाराष्ट्रातील प्रमुख नगदी पिकांपैकी एक असून महाराष्ट्रातील नाशिक तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड केली जाते. महाराष्ट्रमध्ये आता या दोन जिल्ह्यांशिवाय कमी अधिक प्रमाणामध्ये सर्वच जिल्ह्यात  गेल्या काही वर्षांपासून कांद्याच्या लागवड क्षेत्रामध्ये वाढ होताना दिसून येत आहे.

कांदा पिकाच्या बाबतीत पाहिले तर कांद्यासाठी सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये मजुरांची आवश्यकता भासते व ती प्रामुख्याने कांदा पिकाची लागवड आणि काढणी याकरिता खूप मोठ्या प्रमाणावर मजूर लागतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा बराचसा कांदा उत्पादनाचा खर्च हा मजुरीवर होताना दिसून येतो.

या व्यतिरिक्त जेव्हा कांद्याची बियाणे तयार करण्यासाठी डेंगळे कांदा लागवड प्रामुख्याने केली जाते व ही कांदा लागवड बेडवर केली जाते. जर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर बियाण्यासाठी कांदा लागवड करण्याचे निश्चित केले तर यासाठी देखील मोठ्या प्रमाणावर मजुरांची आवश्यकता भासू शकते.

त्यामुळे आता शेतकऱ्यांची ही समस्या समोर ठेवून आयसीएआर अर्थात भारतीय कृषी संशोधन संस्थेने अत्याधुनिक कांदा लागवड यंत्र तयार केले आहे व हे यंत्र प्रामुख्याने बेडवर बियाण्याचा कांदा लावण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना मदत करणार आहे.

शेतकऱ्यांना जर कांद्याचे बियाणे तयार करण्यासाठी कांदा लागवड करायचे असेल तर ती प्रामुख्याने डिसेंबर ते जानेवारी या महिन्याच्या दरम्यान केली जाते.

परंतु या पद्धतीची कांदा लागवड करण्यासाठी जमीन ही खुरपे किंवा कुदळणे खोदावी लागते. परंतु आता आयसीयआरने विकसित केलेल्या या यंत्राच्या मदतीने शेतकऱ्यांना आता बियाण्यासाठीचा कांदा लावता येणे सोपे जाणार आहे.

 कसे काम करते हे यंत्र?

भारतीय कृषी संशोधन संस्था अर्थात आयसीयआरने विकसित केलेले हे कांदा लागवडीसाठीचे यंत्र ट्रॅक्टरचलित आहे. त्यामुळे कांदा लागवड करणे खूप आरामदायी होणार असून या यंत्राला एक ट्रॅक्टरचलित बेल्ट देण्यात आला असून जो सतत फिरत राहतो व त्या मदतीने कांदा लागवड करणे सोपे जाते.

या यंत्राला चार टोके देण्यात आली असून त्यातून बियाण्याचा कांदा लागवड करण्यासाठी एकेक कांदा याप्रमाणे एका वेळी चार कांदे या चार टोकातून सोडता येणार आहेत. त्यामुळे या यंत्राच्या मदतीने एकसमान एकसारख्या अंतरावर कांद्याची लागवड करता येणे शक्य होणार आहे.

या यंत्राचा उपयोग हा भारतातील जवळपास महाराष्ट्रात तसेच गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश व इतर ज्या राज्यांमध्ये कांदा लागवड केली जाते त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना होणार आहे.

त्यामुळे आता या यंत्राच्या मदतीने बियाणे तयार करण्यासाठी जे काही कांदा लागवड करावी लागते ती आता सोपी होणार आहे व शेतकऱ्यांचे कष्ट वाचणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe