Solar Panel: 7 किलोवॅट सोलर सिस्टम घरातील विजेची गरज भागवण्यासाठी आहे पुरेशी? किती येऊ शकतो खर्च? वाचा माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Solar Panel:- सध्या विजेची टंचाई आणि विजेचे वाढलेले प्रति युनिटचे दर पाहता सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक दृष्ट्या परवडण्यासारखे नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे येणारा काळामध्ये सौर ऊर्जेचा वापर हा अनेक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा ठरणार आहे. म्हणूनच सौर ऊर्जा वापराला प्रोत्साहन मिळावे याकरिता केंद्र आणि राज्य सरकारची देखील महत्वपूर्ण योजना असून या योजनांच्या माध्यमातून सोलर पॅनल बसवण्याकरिता अनुदान देखील देण्यात येते.

घरगुती वीज वापराच्या दृष्टिकोनातून जर आपण छतावर सोलर पॅनल बसवले तर नक्कीच याकरिता एकदा केलेली गुंतवणूक तुम्हाला कित्येक वर्ष वीजबिलापासून कायमची मुक्तता देऊ शकते. त्यामुळे या लेखात आपण लुमिनस या प्रसिद्ध असलेल्या कंपनीच्या सोलर पॅनल बद्दल महत्वाची माहिती घेणार असून या सोलर पॅनल ची किंमत व इतर महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत.

 लुमिनस कंपनीच्या सात किलोवॉटच्या सोलर पॅनलची माहिती

लुमिनस ही एक प्रसिद्ध कंपनी असून या कंपनीची सोलर सिस्टम ही खूप फायद्याची ठरणारी आहे. जर आपण सात किलोवॅटच्या सोलर सिस्टमचा विचार केला तर ती एका दिवसामध्ये तीस ते पस्तीस युनिट वीज तयार करू शकते. म्हणजेच जर तुमचा दररोज विजेचा वापर 30 ते 35 युनिट असेल तर  सात किलो वॅटची सौर सिस्टम तुमच्यासाठी फायद्याची ठरते. जर आपण सात किलो वॅट लुमिनस कंपनीच्या सोलर सिस्टमचा विचार केला तर यामध्ये तुम्हाला वापरण्यात येणारी सर्व उत्पादन व त्यांची किंमत देखील जाणून घेणे गरजेचे आहे.

1- सात किलोवॉटचा लुमिनस कंपनीचा सोलर इन्वर्टरची किंमत जर आपण लुमिनस कंपनीचा विचार केला तर ही कंपनी पीडब्ल्यूएम आणि एमपीपीटी सारखे सर्व प्रकारचे सोलर इन्वर्टर तयार करते. परंतु हे सर्व सोलर इन्वर्टर असलेले पॅनल वेगवेगळ्या किमतींमध्ये येतात. त्यामुळे तुमच्या बजेट आणि गरज यानुसार तुम्ही सोलर इन्वर्टर निवडणे गरजेचे आहे. समजा तुमच्याकडे पैसा कमी असेल तर तुम्ही पीडब्ल्यूएम तंत्रज्ञानाचा सोलर इन्वर्टर खरेदी करू शकता आणि जर तुम्हाला चांगला सोलर इन्वर्टर पाहिजे असेल तर तुम्ही एमपीपीटी तंत्रज्ञानाचा सोलर इन्वर्टर घेऊ शकता.

यामध्ये जर एमपीपीटी प्रकारच्या सोलार इन्वर्टरचा विचार केला तर हे इन्व्हर्टर 7500Va पर्यंतचा लोड चालवू शकते. या इन्व्हर्टरची Voc श्रेणी 480V Vdc आहे त्यामुळे तुम्ही या इन्वर्टरवर 36/60/72 सेलसह सोलर पॅनल देखील वापरू शकतात. यासोबत तुम्हाला 50A वर्तमान रेटिंग चा सोलर चार्ज कंट्रोलर देखील मिळतो. या इन्वर्टरवर तुम्ही साडेसात हजार वेट पर्यंतचे पॅनल बसवू शकतात.

समजा हा इन्व्हर्टर 96v वर चालणार असेल तर याकरिता इन्वर्टर मध्ये आठ बॅटरी बसवणे गरजेचे असेल. या इन्व्हर्टरचे जर आउटपुट बघितले तर ते प्युवर साईन वेव्ह असून या माध्यमातून तुम्ही सर्व उपकरणे उत्तम प्रकारे चालवू शकतात. यावर तुम्हाला दोन वर्षाची वॉरंटी मिळते.

2- लुमिनस सोलर बॅटरीची किंमत लुमिनस कंपनी अनेक प्रकारच्या सोलर बॅटरी देखील बनवते. त्यामुळे तुमची आवश्यकतेनुसार तुम्ही बॅटरीची खरेदी करू शकतात. परंतु जर तुम्ही कमीत कमी 100 ओहम क्षमतेची बॅटरी खरेदी केली तर तुम्हाला दहा हजार रुपयांमध्ये मिळते. परंतु तुम्हाला जर जास्त बॅटरी बॅकअप हवा असेल तर तुम्ही 150AH क्षमतेची बॅटरी खरेदी करू शकतात व या बॅटरी ची किंमत पंधरा हजार रुपयांच्या आसपास असेल.

3- लुमिनस कंपनीच्या सात किलोवॅट सौर पॅनलची किंमत लुमिनस कंपनी वेगवेगळ्या आकाराचे व तंत्रज्ञानाने पॅनल बनवते व तुम्ही तुमच्या गरज व बजेट यानुसार सौर पॅनलची खरेदी करू शकतात. जर तुम्ही पीडब्ल्यूएम तंत्रज्ञानाचे सोलर इन्वर्टर घेतले तर तुम्हाला पॉलीक्रिस्टलाईन तंत्रज्ञानाचे सोलर पॅनल खरेदी करणे गरजेचे आहे

आणि जर तुम्ही एमपीपीटी तंत्रज्ञानाचे सोलर इन्वर्टर खरेदी केले तर तुम्हाला मोनोपर्क हाफ तंत्रज्ञानाचे सोलर पॅनल खरेदी करणे गरजेचे आहे. यामध्ये सात किलोवॅट पॉलिक्रिस्टलाईन सोलर पॅनलची किंमत दोन लाख दहा हजार तर सात किलो वॅटच्या मोनो पार्क हाफ कट सोलर पॅनलची किंमत दोन लाख 45 हजार रुपये इतकी असेल.

 यासोबत इतर आवश्यक उपकरणाची किंमत

सोलर सिस्टम बसवल्यानंतर तुम्ही इन्व्हर्टर,बॅटरी सोलर पॅनल याशिवाय तुम्हाला काही उपकरणाची गरज भासते याकरता तुम्हाला वेगळा खर्च करणे देखील गरजेचे असते. जसे की तुम्हाला सोलर पॅनल बसवण्याकरिता स्टॅन्ड लागतो व हा सोलर पॅनल कनेक्ट करण्यासाठी तारांची देखील आवश्यकता असते.

तसेच तुम्ही बसवत असलेल्या सोलर सिस्टिमच्या अर्थिंग करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला वेगळा खर्च करावा लागतो.तसेच तुम्हाला जर एससीडीबी आणि डीसीडीबी बॉक्स बसवायचं असेल तर त्याचा तुम्हाला वेगळा खर्च येतो. या इतर उपकरणांकरिता तुम्हाला 35 हजार रुपये खर्च येऊ शकतो.

 लुमिनस कंपनीच्या सर्वात स्वस्त सात किलोवॉटची किंमत

एमपीपीटी तंत्रज्ञानाचा इन्व्हर्टर घेतला तर त्याची किंमत 80 हजार रुपये,8×100Ah सोलर बॅटरीची किंमत 80 हजार, सात किलो वॅट सोलर पॅनल दोन लाख दहा हजार, इतर खर्च 35000 असे सगळे मिळून जर पकडले तर संपूर्ण खर्च हा चार लाख 5000 पर्यंत येऊ शकतो

 एमपीपीटी तंत्रज्ञानाचा सोलर इन्वर्टर आणि मोनो हाफ कट तंत्रज्ञानाचा सोलर पॅनलची किंमत

या पॅनल सिस्टीममध्ये इन्व्हर्टर एमपीपीटी तंत्रज्ञानाचे हे 80 हजार रुपये,8×150Ah सोलर बॅटरी ची किंमत एक लाख वीस हजार रुपये, सात किलो वॅट सौर पॅनल दोन लाख 45 हजार, इतर खर्च 35000 असे मिळून एकूण चार लाख 80 हजार रुपये इतका येऊ शकतो.

 लुमिनस कंपनीच्या सात किलो वॅट सोलर पॅनलवर किती उपकरणे चालवू शकतो?

सात किलोवॅट लुमिनस सोलर सिस्टम वर कुलर, पंखे, घरातील लाईट तसेच वाशिंग मशीन, फ्रिज, कंप्यूटर तसेच प्रिंटर, इंडक्शन एक टन इन्वर्टर एसी, एक एचपी सबमर्सिबल इत्यादी लुमिनस 7 किलोवॅट सोलर सिस्टिम वर अतिशय आरामात चालवता येतात.

 यामध्ये अनुदान मिळते का?

जर तुम्ही बॅटरी नसलेली ग्रीड सोलर सिस्टम बसवली तर या प्रणालीवर तुम्हाला साधारणपणे 30% पर्यंत सबसिडी मिळू शकते.