सध्या मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञान आणि प्रगती केली असून अनेक नवनवीन उपकरणे म्हणजेच गॅजेट्स बाजारपेठेमध्ये अनेक कंपन्यांनी लॉन्च केलेले आहेत. या अशा गॅझेटमुळे अनेक अवघड गोष्टी आता अगदी सोप्या झाल्या असून लोकांना देखील आता मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारचे गॅझेट वापरायची सवय झालेली आहे.
यामध्ये स्मार्टफोनचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर आता होऊ लागला असून अगदी शालेय मुलांपासून तर वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या हातात तुम्हाला स्मार्टफोन दिसून येतो. परंतु यामध्ये एक बाब लक्षात ठेवण्यासारखे आहे व ती म्हणजे कुठल्याही चांगल्या गोष्टीची एक वाईट बाजू देखील असते व अशाच प्रकारची वाईट बाजू तंत्रज्ञानाची देखील आहे.
आता आपल्याला माहित आहे की ज्या पद्धतीने स्मार्टफोन मोठ्या प्रमाणावर आले व त्यासोबतच कनेक्टिव्हिटी साठी स्मार्टफोन सोबत ब्लूटूथ वायरलेस कनेक्टिव्हिटी, हेडफोन तसेच टीव्ही इत्यादी अनेक डिवाइस बाजारामध्ये आले. स्मार्टफोनच्या दृष्टिकोनातून बघितले तर हेडफोन आणि ब्लूटूथ हे वायरलेस कनेक्टिव्हिटी वापराच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची डिवाइस असून यांचा वापर आता खूप मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून येते.
परंतु या सगळ्या डिवाइसमध्ये जर आपण ब्लूटूथचा विचार केला तर याच्या मदतीने अनेक स्कॅमर्स तुमच्या स्मार्टफोन मध्ये प्रवेश करून तुमचा डेटा देखील चोरी करू शकतात. त्यामुळे ब्लूटूथ वापरताना काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. या अनुषंगाने या लेखात आपण स्कॅमर्स ब्लूटूथ सक्षम असलेल्या डिवाइस वर कशाप्रकारे हल्ला करू शकतात हे जाणून घेऊ.
ब्लूटूथ सक्षम डिव्हाईसवर अशाप्रकारे केला जातो अटॅक
1- ब्लूजॅकिंग– हा एक प्रकारचा सायबर अटॅक असून यामध्ये जे काही स्कॅमर्स किंवा सायबर बामटे असतात ते ब्लूटूथ सक्षम असलेल्या डिव्हाइस म्हणजेच स्मार्टफोनवर नको असलेले मेसेज आणि काही फाइल्स पाठवत असतात. या माध्यमातून वापरकर्त्याच्या प्रायव्हसीला काही धोका निर्माण होण्याची शक्यता असते व या ब्ल्यू जॅकिंगच्या मदतीने तुमचा महत्त्वाचा डेटाचा एक्सेस स्कॅमर्सना मिळतो.
2- ब्लूबंगिंग– या प्रकारामध्ये स्कॅमर्स हे ब्लूटूथच्या मदतीने तुमच्या स्मार्टफोनमध्ये प्रवेश करतात व तुमच्या फोनवर पूर्ण नियंत्रण मिळतात. याच्या मदतीने हॅकर्स किंवा स्कॅमर्स हे तुमची कुठलीही परवानगी न घेता तुमच्या फोनचा वापर कॉल करण्यासाठी किंवा मेसेज पाठवण्यासाठी करू शकतात.
3- ब्लूस्नार्फीग– यामध्ये स्कॅमर हे ब्लूटूथचा जो काही प्रोटोकॉल असतो त्यामध्ये पळवाटा शोधतात व स्मार्टफोन मधील किंवा डिवाइस मधील कॉन्टॅक्ट, डेटा, फोटो, मेसेज आणि मल्टीमीडिया फाइल्स यांचा ॲक्सेस मिळवू शकतात व याची आपल्याला साधी पुसटशी माहिती देखील मिळत नाही किंवा कल्पना देखील येत नाही.
4- आरोग्यासाठी घातक– आपल्याला बऱ्याच जणांच्या कानामध्ये कायमच ब्लूटूथ दिसून येते व बऱ्याचदा याचा वापर गाणे ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. अशा पद्धतीने जर जास्त कालावधी करिता तुम्ही ब्लूटूथच्या साह्याने गाणे ऐकाल तर तुमची स्मरणशक्ती देखील कमी होण्याची शक्यता असते.
यासोबतच तुम्ही वायरलेस हेडफोन्स किंवा एअरफोन्स इत्यादींचा जास्त वापर केला तर त्यातून जे काही रेडिओ फ्रिक्वेन्सी रेडिएशन आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन बाहेर पडतात ते आरोग्याला घातक ठरू शकतात. या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, लहान आकाराचे एअरबड्स, इयरफोन्स खूप धोकादायक असतात. यांच्या माध्यमातून जी काही रेडिएशन्स बाहेर निघतात ते कान आणि मेंदू अशा दोघं अवयवांना नुकसान पोहोचवतात. त्यामुळे ब्लूटूथचा वापर करताना काळजी घेणे खूप गरजेचे आहे.