शालेय विद्यार्थ्यांपासून तर अगदी वृद्ध व्यक्तींच्या हातामध्ये आपल्याला आता स्मार्टफोन दिसून येतात. तसे पाहायला गेले तर स्मार्टफोन ही एक काळाची गरज असून अनेक अशक्य गोष्टी आपल्याला स्मार्टफोनच्या मदतीने आता शक्य करता येतात. कोणतीही व्यक्ती जेव्हा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करते तेव्हा त्याचा कॅमेरा तसेच रॅम, स्मार्टफोनचे स्टोरेज आणि बॅटरी लाईफ इत्यादी गोष्टी प्रामुख्याने बघत असते
व त्यानंतर ही सगळी वैशिष्ट्ये ज्या स्मार्टफोनमध्ये मिळतील असा आपल्या बजेट मधील स्मार्टफोन खरेदी करण्याला प्राधान्य दिले जाते. कारण स्मार्टफोनची बॅटरी लाईफ ही खूप महत्त्वाची असून ज्या स्मार्टफोनची बॅटरी एकदा चार्ज केल्यावर दीर्घ काळापर्यंत चालते असे स्मार्टफोन खूप फायद्याचे ठरतात
व त्यामुळेच बरेच व्यक्ती स्मार्टफोन खरेदी करताना बॅटरी लाइफ दीर्घकाळ असेल असे स्मार्टफोन खरेदी करतात. परंतु यामध्ये बऱ्याच कंपन्यांचे स्मार्टफोन बाजारात असल्यामुळे कोणत्या स्मार्टफोनची बॅटरी लाईफ चांगली आहे याबाबतीत गोंधळ उडतो. त्यामुळे आपण या लेखांमध्ये 25 हजार रुपये पेक्षा कमी किंमत असलेल्या काही स्मार्टफोन बघणार आहोत की ज्यांची बॅटरी लाइफ खूप उत्तम अशी आहे.
दीर्घकाळ बॅटरी लाईफ असणारे स्मार्टफोन
1- ऑनर एक्स 9 बी 5 जी– ऑनरच्या हा स्मार्टफोन खूप उत्तम असून यामध्ये 5800 mAh बॅटरी पॅक देण्यात आला आहे व हा फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो व यामध्ये 35 डब्ल्यू चार्जिंग सपोर्ट सह हे डिवाइस पूर्णपणे चार्ज व्हायला दोन तास लागतात. या स्मार्टफोनची किंमत 24999 आहे.
2- सॅमसंग गॅलेक्सी एफ 54 5 जी– सॅमसंगचा हा स्मार्टफोन 6000 mAh बॅटरी सह येतो व 25 डब्ल्यू चार्जिंगला सपोर्ट करतो. याला जर दोन तास चार्ज केले तर पूर्ण दिवसभर याची बॅटरी टिकते. या सॅमसंगच्या स्मार्टफोनची किंमत 22 हजार 999 रुपये इतकी आहे.
3- वनप्लस नॉर्ड सीई4- वनप्लसच्या या स्मार्टफोनमध्ये 5500 mAh बॅटरी पॅक आहे व यामध्ये 100 डब्ल्यू फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील आहे. अवघ्या तीस मिनिटांमध्ये तुमचा स्मार्टफोन पूर्णपणे चार्ज होतो. याची रॅम ही 8 जीबीची आहे व 128 जीबी स्टोरेज यामध्ये उपलब्ध आहे. या स्मार्टफोनची किंमत 24 हजार 999 रुपये आहे.
4- इंटेल पी 40 प्लस– हा स्मार्टफोन 7000 mAh बॅटरी लाइफसह येतो व याची बॅटरी एकदा चार्ज केल्यावर दोन दिवसापर्यंत टिकून राहू शकते. हा एकदम बजेट फ्रेंडली स्मार्टफोन असून याची किंमत फक्त आठ हजार पाचशे रुपये आहे.
5- मोटोरोला जी 54- हा स्मार्टफोन 33W जलद चार्जिंगला सपोर्ट करतो आणि यामध्ये 6000 mAh बॅटरी लाइफ असून एकदा चार्ज केल्यावर हा देखील दिवसभर टिकतो. एवढेच नाही तर यामध्ये आता लवकरच 6000 mAh बॅटरीला सपोर्ट करणारा मोटोरोलाचा जी 60(G64) स्मार्टफोन भारतात लॉन्च होणार आहे. या स्मार्टफोनची किंमत 18999 रुपये इतकी आहे.