बऱ्याचदा आपल्याला विजेच्या लपंडावामुळे रात्रीच्या वेळी देखील अंधारात राहण्याची वेळ येते. त्यामुळे अशा विज नसताना घरात लाईट रहावी याकरिता इन्वर्टरचा पर्याय निवडला जातो. परंतु इन्वर्टर हे खर्चिक असल्यामुळे प्रत्येक घरामध्ये इन्व्हर्टर असेलच असे नाही. घरामध्ये लाईट नसली तर घर तुमचे कितीही सुंदर राहिले तरी देखील त्याला काही महत्त्व नसते.
या सगळ्या समस्येवर जर तुम्हाला मात करायची असेल तर तुमच्यासाठी उत्तम असा पर्याय म्हणजे एलईडी बल्ब हे होय. या एलईडी बल्बचे वैशिष्ट्य म्हणजे लाईट नसली तरी देखील हे जळत राहतात व घरात प्रकाश देत राहतात. एलईडी बल्ब वैशिष्ट्यपूर्ण असे असतात. त्यांचीच माहिती आपण या लेखात घेणार आहोत.
लाईट गेली तरी घरामध्ये प्रकाश देतात एलईडी बल्ब
या एलईडी बल्बचे वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा घरात लाईट सुरु असते तेव्हा ते आपोआप चार्ज होतात व लाईट गेली की आपोआप ते प्रकाशित होतात व घरामध्ये प्रकाश देत राहतात. तसेच यांची चार्जिंग क्षमता देखील बऱ्याच वेळ असते. या एलईडी बल्बचे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत व त्यानुसार त्यांची वैशिष्ट्ये देखील वेगवेगळे आहेत. त्यातील काही प्रकार आपण पाहू.
एलईडी बल्बचे प्रकार
1- हॅलोनिक्स 9W इन्वर्टर रिचार्जेबल इमर्जन्सी एलईडी बल्ब– हा बल्ब नऊ वॅटच्या पावर वर चालणारा असून यामध्ये इन्व्हर्टर फंक्शन देण्यात आलेले आहे. याच्यापासून निघणाऱ्या थंड प्रकाशामुळे संपूर्ण घर प्रकाशाने उजळून निघते. हे बल्ब नॉन डिग्रडेबल बल्ब आहे.हा बल्ब नऊ वॅट पावर वर चालतो.
यापासून तेजस्वी प्रकाश मिळतो व वर्षानुवर्ष हा खराब होत नाही. हा ऊर्जा कार्यक्षम बल्ब असल्यामुळे जास्त विजेचा वापर करत नाही. लाईट गेल्यानंतर तब्बल चार तासापर्यंत हा प्रकाश देत राहतो. त्यामध्ये लिथियम आयन बॅटरी वापरलेली असते व कोणत्याही बल्ब सॉकेट मध्ये हा आरामात बसतो.
2- फिलिप्स रिचार्जेबल इमर्जन्सी एलईडी बल्ब– या एलईडी बल्बच्या प्रकाशाचा रंग क्रिस्टल पांढरा असून तो आठ ते दहा तासात सहज चार्ज होतो व लाईट गेल्यानंतर सुमारे चार तास जळतो. चार तासापर्यंत बॅटरी बॅकअप मिळतो तसेच यामध्ये 2000 mAH लिओन रिचार्जेबल बॅटरी देण्यात आलेली आहे.
घरात वीज असताना हा आपोआप चार्ज होतो व आठ तासाचा चार्ज केल्यानंतर त्याची चार्जिंग ऑटोमॅटिक बंद होते. या बल्बमध्ये पुश बटन कंट्रोलर चार्जिंग संरक्षणाचा पर्याय आलेला आहे. याची चमक साधारणपणे 700 लुमेनची असून पूर्ण चार्ज केल्यानंतर हा आपोआप बंद होतो.
3- बजाज 9W B22D एलईडी पांढरा इन्व्हर्टर बल्ब– हा बल्ब इन्व्हर्टर लॅम्प डिझाईन सह असून 9 वॅटचा आहे. त्याची किंमत खूपच कमी आहे यावर एक वर्षाची वारंटी देखील येते. यामध्ये चार तासांचा पावर बॅकअप मिळतो. हा बल्ब तुम्ही घर व घराच्या बाहेर देखील वापरू शकतात. 145 ग्रॅम वजनाचा हा बल्ब यूएसबी टाईप कनेक्टिव्हिटी तंत्रज्ञानासह सुसज्ज आहे. यामध्ये आऊट ऑफ कट ऑफ रिचार्जेबल फंक्शन देण्यात आलेले आहे.
4- 12 वॉट 6500k इन्वर्टर रिचार्जेबल इमर्जन्सी एलईडी बल्ब– हा बल्ब शहरे व ग्रामीण भागासाठी उत्कृष्ट असून यामध्ये उत्कृष्ट रिचार्ज फंक्शन देण्यात आलेले आहे. विज गेल्यानंतर कित्येक तासापर्यंत हा प्रकाश देत राहतो. या बल्बचे युजर रेटिंग देखील चांगले आहे व याची किंमत पाचशे रुपये पेक्षा कमी आहे. हॅलोजन बल्ब सारखा हा प्रकाश देतो. आठ ते दहा तासात हा पूर्णपणे चार्ज होतो.
5- 9W फास्ट चार्ज इमर्जन्सी इन्वर्टर एलईडी बल्ब– हा बल्ब नऊ वॅट पावरने समर्थित असून तेजस्वी प्रकाश देण्यासाठी ओळखला जातो. याला ग्राहकांकडून देखील चांगले रेटिंग मिळालेली आहे. तुम्ही घरात तसेच बाहेरील बागेत देखील वापरू शकता व याची किंमत कधीतरी कमीत कमी आहे.
त्यामुळे विजेत बचत करायचे असेल तर तुम्ही हे बल्ब घरामध्ये लावू शकतात. लाईट नसताना देखील घरामध्ये तुम्हाला प्रकाश उपलब्ध होऊ शकतो. तसेच तुम्ही हे बल्ब इच्छा असेल तर बंद देखील करू शकतात.