‘ही’ पद्धत वापरा आणि 2 मिनिटात शोधा तुमच्या नावावर किती सिम ॲक्टिव्ह आहेत! नाहीतर विनाकारण अडकाल एखाद्या गुन्ह्यात

Ajay Patil
Published:
sim card

सध्या आपण ऐकतो किंवा वाचतो की सायबर गुन्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून असे सायबर क्राईम करणारे गुन्हेगार हे वेगवेगळ्या युक्त्या योजून अनेक जणांची आर्थिक दृष्टिकोनातून फसवणूक करत असतात. त्यामुळे प्रत्येकाने कुठल्याही प्रकारच्या ऑनलाइन गोष्टी करताना सावधगिरी बाळगणे तितकेच गरजेचे आहे.

तसेच फसवणुकीच्या किंवा गुन्ह्याची एखादी घटना पूर्णत्वास आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मोबाईलचा वापर केला जातो व अशावेळी जे सिम कार्ड किंवा जो मोबाईल नंबर वापरला जातो तो कोणाच्या नावावर आहे किंवा ते सिम कार्ड कोणाच्या नावावर आहे या गोष्टीला खूप महत्त्व असते.

जर ते सिम कार्ड दुसऱ्या एखाद्याच्या नावावर असेल तर ज्यांच्या नावावर ते सिम कार्ड आहे तोच व्यक्ती संबंधित गुन्ह्यात अडकण्याची दाट शक्यता असते. तसेच सध्या मोठ्या प्रमाणावर कोणाच्यातरी आयडीवर दुसरे कोणीतरी सिम वापरल्याचे आपल्याला दिसून येते व आपल्याला ते माहिती देखील पडत नाही.

त्यामुळे आपले काही चुकी नसताना देखील अनेक वेळा आपल्याला खूप मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. याकरिता तुमच्या नावावर किंवा तुमच्या आयडीवर किती सिम कार्ड ऍक्टिव्ह आहेत किंवा तुमच्या आयडीवर दुसरे कोणी व्यक्ती तर सिम वापरत नाही ना हे पाहणे खूप गरजेचे आहे.

त्यामुळे या लेखात आपण अशी एक पद्धत पाहणार आहोत की या पद्धतीच्या मदतीने तुम्ही दोनच मिनिटांमध्ये तुमच्या नावावर किती सिम कार्ड किंवा कोणते मोबाईल नंबर ऍक्टिव्ह आहेत हे शोधू शकता.

 या प्रक्रियेचे पालन करा आणि तुमच्या आयडी वरील सिम कार्डचा शोध घ्या

1- याकरिता सगळ्यात अगोदर तुम्हाला tafcop.dgtelecom.gov.in या पोर्टल वर जावे लागेल.

2- त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या बॉक्समध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल आणि आलेल्या ओटीपीच्या मदतीने तुम्हाला लॉगिन करावे लागेल.

3- आता तुम्हाला तुमच्या आयडी वरून चालू असलेल्या सर्व नंबरचे तपशील मिळतील.

4- आलेल्या यादीमध्ये जर एखादा नंबर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही त्या मोबाईल क्रमांकाविषयीची तक्रार करू शकता.

5- या तक्रारीसाठी तुम्हाला नंबर आणि नॉट माय नंबर हा पर्याय निवडावा लागेल.

6- त्यानंतर खालील रिपोर्ट बॉक्स वर क्लिक करावे.

7- तुम्ही तुमची तक्रार दाखल केल्यानंतर तुम्हाला तिकीट आयडी संदर्भ क्रमांक दिला जातो.

8- त्यानंतर तो नंबर ऑटोमॅटिक बंद होतो किंवा तुमचा आधार कार्डमधून काढून टाकला जातो.

 एका आयडीवर किती सिम कार्ड मिळतात?

आपण याबद्दलचे नियम बघितले तर त्यानुसार तुम्ही एका आयडीवर 9 सिम कार्ड ऍक्टिव्ह करू शकतात.परंतु देशातील आसामसह ईशान्यकडील राज्य आणि जम्मू काश्मीर इत्यादी ठिकाणी एका आयडीवर फक्त सहा सीम कार्ड ऍक्टिव्ह करता येतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe