सध्या मोठ्या प्रमाणावर डिजिटल पेमेंट केले जाते व याकरिता यूपीआय प्लॅटफॉर्मचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो.तुम्हाला कोणाला पैसे ट्रान्सफर करायचे असतील, मोबाईल रिचार्ज किंवा इलेक्ट्रिसिटी बिल भरायचे असेल तरी देखील आता यूपीआयच्या माध्यमातून हे शक्य आहे.
तसेच दुसरे म्हणजे जेव्हाही आपण काही गोष्टी खरेदी करण्यासाठी बाजारामध्ये जातो तेव्हा 50 ते 100 रूपयाची खरेदी केली तरी देखील आपण ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करतो. म्हणजे आता या डिजिटल युगामध्ये रोख पैसे जवळ बाळगणे कमी कमी होत असून ऑनलाइन पद्धतीने पेमेंट करण्याचा ट्रेंड वाढताना दिसून येत आहे.
जेव्हा आपण अगदी रस्त्यावरील छोट्याशा दुकानात देखील काही खरेदी करतो तरी देखील आपण त्या दुकानावर असलेला क्यूआर कोड स्कॅन करून समोरच्याला पेमेंट करत असतो. या माध्यमातून थेट पैसे हे दुकानदाराच्या खात्यामध्ये जात असतात. परंतु अजून देखील बऱ्याच छोट्या दुकानदारांना हा क्यूआर कोड कसा मिळवतात? याबद्दलची माहिती नाही. त्यामुळे या लेखामध्ये आपण याबद्दलची माहिती घेणार आहोत.
तुमच्या दुकानासाठी अशा पद्धतीने तयार करा क्यूआर कोड
जर तुम्हाला देखील तुमच्या दुकानामध्ये क्यूआर कोड तयार करायचा असेल तर तुम्हाला यूपीआय पेमेंट ॲप्स डाऊनलोड करणे गरजेचे राहिल व हे ॲप्स डाऊनलोड करून तुम्ही तुमच्या बँक खात्यासोबत लिंक करणे महत्त्वाचे राहील. अशा पद्धतीने तुम्ही बँक खाते लिंक केल्यानंतर सोप्या पद्धतीने क्यूआर कोड डाऊनलोड करू शकतात.
महत्त्वाचे म्हणजे अशा पद्धतीने क्यूआर कोड डाऊनलोड करताना तुम्हाला कुठल्याही प्रकारचे पैसे द्यावे लागत नाही. तुम्हाला गुगल पे चा क्यूआर कोड दुकानात लावायचा असेल तर तुम्ही गुगल पे ॲप्लिकेशनच्या माध्यमातून क्यूआर कोड डाऊनलोड करू शकतात.
या सोप्या पद्धतींचा अवलंब करा
1- तुमचे जे बँक खाते सक्रिय आहे ते अगोदर पेमेंट ॲपशी लिंक करा.
2- त्यानंतर त्या संबंधित पेमेंट ॲपवरून तुमचा युनिक भारत क्यूआर कोड जनरेट करा.
3- त्यानंतर तो जनरेट केलेला क्यूआर कोडची प्रिंट काढा आणि पेमेंट काउंटरच्या भिंतीवर दुकानात चिकटवा.
4- या पद्धतीने ग्राहक तुमच्या दुकानावरून काही खरेदी करतील व त्यानंतर चिकटवलेला क्यूआर कोड स्कॅन करून पेमेंट करतील व अशापद्धतीने ते पैसे थेट तुमच्या बँक खात्यात जमा होतील.