सध्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला असून या तंत्रज्ञानाच्या मदतीने आता अनेक अवघड गोष्टी अगदी चुटकीसरशी एका क्लिकने पूर्ण करता येणे शक्य झाले आहे. तसेच इंटरनेटच्या या जमान्यामध्ये अनेक गोष्टी ऑनलाईन झाल्यामुळे आता या टप्प्यामध्ये एसटी महामंडळ देखील मागे नाही.
एसटी महामंडळ देखील आता हळूहळू बऱ्याच सेवा ऑनलाईन करण्याच्या प्रयत्नात दिसून येत असून याचाच एक भाग म्हणून जानेवारी 2024 पासून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून प्रवाशांच्या सोयीसाठी ऑनलाईन आरक्षण प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे व यामुळे आता प्रवाशांना घरबसल्या एसटीचे आरक्षित तिकीट उपलब्ध होणार आहे.
प्रवाशांना घरबसल्या काढता येईल एसटीचे आरक्षित तिकीट
तंत्रज्ञान आणि डिजिटायझेशनच्या या युगामध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून देखील आता जानेवारी 2024 पासून ऑनलाइन आरक्षण प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली असून या प्रणालीच्या माध्यमातून आता प्रवाशांना घरबसल्या एसटीचे आरक्षित तिकीट उपलब्ध करून देण्यासाठी एसटी महामंडळाच्या माध्यमातून npublic.msrtcors.com हे अधिकृत संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
विशेष म्हणजे या ऑनलाइन तिकीट आरक्षण प्रणालीला प्रवासाच्या माध्यमातून देखील चांगला प्रतिसाद मिळताना दिसून येत असून गेल्या पाच महिन्यात राज्यातील 13 लाख पेक्षा जास्त तिकिटांची विक्री या आरक्षण प्रणालीच्या माध्यमातून झाल्याची माहिती समोर आलेली आहे.
विशेष म्हणजे राज्यभरातील दहा हजार प्रवासी दररोज ऑनलाईन सुविधांचा लाभ घेत असल्याचे दिसून आले आहे. या संकेतस्थळा व्यतिरिक्त एमएसआरटीसी बस रिझर्वेशन एप्लीकेशनच्या माध्यमातून देखील ही सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. हे संकेतस्थळ व एप्लीकेशनच्या माध्यमातून तिकीट काढण्याच्या प्रणालीत बदल करण्यात येऊन ते अपडेट देखील करण्यात आलेले आहे.
ऑनलाइन प्रणाली द्वारे या व्यक्तींना देखील मिळते आरक्षण तिकीट
महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या या ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक, महिला सन्मान योजना तसेच दिव्यांग व्यक्ती व अमृत ज्येष्ठ नागरिकांना देखील त्यांच्या सवलतीचे आगाऊ आरक्षणाचे तिकीट मिळणे शक्य आहे व त्यासाठी देखील वर सांगितलेल्या एसटी महामंडळाचे संकेतस्थळ उपयोगी पडणार आहे.
याबाबत प्रवासांना काही समस्या आल्यास कुठे करावा संपर्क?
महाराष्ट्र राज्य महामंडळाच्या माध्यमातून या ऑनलाइन प्रणालीद्वारे आरक्षण तिकीट काढताना जर प्रवाशांना काही तांत्रिक अडचण आली तर 7738087103 या क्रमांकावर संपर्क साधणे गरजेचे आहे. हा क्रमांक प्रवाशांना जर काही तांत्रिक अडचणी आला तर त्याकरता चोवीस तास उपलब्ध असणार आहे.
समजा एखाद्या वेळी ऑनलाईन आरक्षण करण्यासाठी पैसे भरले व तिकीट मिळाले नाही तर या तक्रारी करिता 0120-4456456 क्रमांक देखील प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.