प्रवास करत आहेत आणि टोल वाचवायचा असेल तर गुगल करेल तुम्हाला मदत! पण कशी? वाचा ए टू झेड माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जेव्हा आपण महामार्गावरून प्रवास करत असतो तेव्हा आपल्याला बऱ्याच ठिकाणी टोलनाक्यावर टोल टॅक्स स्वरूपात पैसे भरावे लागतात. कधी कधी जर लांबचा प्रवास असेल तर  मात्र जाण्यासाठी जितका खर्च लागतो तितकाच खर्च टोल टॅक्समध्ये देखील लागण्याची शक्यता असते.

त्यामुळे बऱ्याचदा काही हजार रुपयांमध्ये आपल्याला टोल भरावा लागतो. याकरिता बरेच जण प्रवास करत असताना काही आडमार्गांचा पर्याय स्वीकारतात. त्यामुळे लांबच्या प्रवासात टोलचे पैसे भरता भरताच आपले नाकीनऊ येतात. त्यामुळे बऱ्याचदा आपल्याला मनात येते की प्रवास करता करता जर हे टोलचे पैसे वाचवता आले तर किती छान होईल.

परंतु टोल भरल्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय देखील नसतो. परंतु यामध्ये चिंता करण्याची गरज नसून तर तुम्हाला प्रवास करायचा आहेच व टोल देखील वाचवायचा आहे तर गुगलचे एक महत्त्वाचे फिचर तुम्हाला या बाबतीत खूप मोठी मदत करू शकते. त्याबद्दलचीच माहिती आपण या लेखात घेऊ.

 टोल वाचवण्यासाठी गुगलचे हे फीचर करेल मदत

तुम्हाला प्रवास करताना जर टोल वाचवायचा असेल तर गुगलचे एक महत्त्वाचे फिचर तुम्हाला यामध्ये खूप मोठी मदत करू शकणार आहे. याचा वापर करून तुम्ही एक रुपया देखील न भरता मोफत प्रवास करू शकणार आहेत. गुगल मॅप्स यामध्ये तुम्हाला खूप मोठी मदत करू शकते.

गुगलचे हे फीचर तुम्हाला प्रवास करताना टॅक्स भरण्यापासून वाचवू शकते. आपल्याला माहित आहे की आपल्याला एखादे स्थानापर्यंत जायचं आहे व त्या ठिकाणी पोहोचण्याचा मार्ग आपल्याला माहिती नाही त्याकरिता आपण तो मार्ग शोधण्यासाठी गुगल मॅपचा वापर करतो व त्या माध्यमातून आपल्याला एक मार्ग हा दाखवला जात असतो. यावरच तुम्हाला तुमच्या मार्गांवर पुढे येणारे टोल प्लाझा कुठे कुठे आहे त्याचा देखील तपशील पाहता येणे आता शक्य आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील गुगल मॅप्स हे ॲप्लिकेशन उघडावे लागते.

तुम्हाला ज्या ठिकाणी जायचे असेल त्या ठिकाणाचा पत्ता किंवा नाव त्यामध्ये नमूद करावे व ते नमूद केल्यानंतर दिशानिर्देश या पर्यायावर टॅप करावे. नंतर तुमचे लोकेशन निवडणे गरजेचे आहे व शीर्षस्थानी वाहन निवडावे. हे झाल्यानंतर साईडला असलेल्या तीन बिंदू दिसतील त्यावर टॅप करावे आणि पर्याय निवडावा.

यामध्ये तुम्हाला अव्हॉइड टोल्स(Avoid Tolls) हा पर्याय त्या ठिकाणी दिसतो तो पर्याय निवडावा. हा पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला ज्या ठिकाणी जायचे आहे तिथपर्यंत ज्या रस्त्यावर टोल नाहीत असा रस्ता तुम्हाला दिसतो. त्या रस्त्याने प्रवास करून तुम्ही टोल टॅक्स वाचवू शकतात.

परंतु यामध्ये लक्षात ठेवण्याची महत्त्वाची बाब म्हणजे टोल वाचवण्याच्या या दाखवलेल्या नवीन मार्गामध्ये तुमचे प्रवासाचे अंतर देखील वाढू शकते. नाहीतर टोल वाचवण्याच्या नादामध्ये तुम्ही जास्त अंतराने देखील गेला तरी तुमचा पैसा जास्त खर्च होऊ शकतो. त्यामुळे या गोष्टीचा विचार करूनच निर्णय घेणे गरजेचे आहे.