file photo

अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्राला पॉर्नोग्राफीच्या आरोपांखाली १९ जुलै रोजी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. या प्रकरणात एका मुलीने खळबजनक आरोप केले आहेत.

व्हिडीओत गुप्तांग दाखवले जातेल हे आम्हाला चित्रीकरणा दरम्यान सांगितले नव्हते. तर त्यांचे गुत्पांग दाखवले जाणार नाही असे चित्रीकरणाआधी त्यांना सांगण्यात आलं होतं.

फसवणूक करत त्यांचे व्हिडीओ शूट केले आणि ते व्हिडीओ अॅपवर टेलिकास्ट केले. पीडित मुलीने बुधवारी या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पॉर्नोग्राफी प्रकरणात समोर आलेल्या या मुलीचा जबाब नोंदवला आहे. यात त्या मुलीने म्हटलं आहे की, चित्रीकरणाआधी तिला सांगितले होते की तिचे इंटिमेट सीन्स शूट केले जातील आणि तिचे गुत्पांग दाखवले जाणार नाही.

यासाठी एख कारारही करण्यात आला होता. त्यासाठी काही हजार रूपये देण्यात आले होते. त्यानंतर जेव्हा पीडितने तो व्हिडीओ पाहिला तेव्हा तिच्या लक्षात आले की व्हिडीओ कुठेच कट आणि एडिट न करता अॅपवर अपलोड केला आहे.