अहमदनगर Live24 टीम, 26 जुलै 2021 :- शेतीकामासाठी एका बागायतदारकडून घेतलेली उचल परत फेडली नाही. म्हणून त्या बागायतदाने चक्क पाथर्डी तालुक्यातील दगडवाडी येथील एका युवकाचे अपहरण केले होते.

मात्र सहाय्यक पोलिस निरीक्षक वाघ यांच्या पथकाने अपहरण झालेल्या या युवकाची अवघ्या २४ तासाच्या आत सुटका करत अपहरण करणाऱ्यास अटक केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, पाथर्डी तालुक्यातील दगडवाडी येथील शहादेव उमाप हा शेतीकामासाठी वाघमारे यांच्याकडे गेला होता.

दरम्यान उमाप याने वाघमारे यांच्याकडून उचल घेतली होती. मात्र ती घेतलेली कामाची उचल फिटली नाही म्हणुन दिलीप वाघमारे (रा.माळेगाव,ता.शिरुर ,जि.बीड) याने चारचाकी वाहनातुन येवुन करंजी बसस्थानकावरुन शहादेव उमाप याचे अपहरण केले.

नव्याने पोलिस ठाण्यात दाखल झालेले पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्याकडे गुन्हा नोंदवुन तपास लावण्याची मागणी केली होती.

पोलिस उपनिरीक्षक वाघ यांच्या पाथकाने संशयीतांचा तिन तास पोलिसांनी पाठलाग केला आणि नानगाव (ता.दौंड, जि.पुणे) येथे शिवाजी वाघमारे यांच्या ताब्यातुन शहादेव उमाप याची सुटका केली. वाघमारे याचा एक सहाकरी पळुन गेला आहे. पोलिस शोध घेत आहेत.