file photo

अहमदनगर Live24 टीम, 25 जुलै 2021 :- मी शहरी भागात सेवा केलेली आहे. मात्र ग्रामीण भागाचा माझा चांगला अभ्यास आहे. जनतेला पोलिस आपले वाटावेत असे काम करु.  त्यात पाथर्डी ही संतांची भुमी आहे. इथे देवांचे वास्तव्य होते .

येथील सामान्य माणसाच्या रक्षणासाठी व गुन्हेगारांच्या निर्दलनासाठी मला जिल्हा पोलिसप्रमुखांनी पाठविले आहे. गुन्हेगारांना गजाआड करुन येथील गुंडगिरी मोडीत काढु. असा सर्वसामान्य नागरिकांना दिलासा तर गुन्हेगारांना इशारा पाथर्डीचे नूतन पोलिस निरीक्षक सुरेश चव्हाण यांनी दिला.

पाथर्डीचे पोलिस निरीक्षक अरविंद जोधळे यांची तडकाफडकी बदली झाली असून त्यांच्या जागी अहमदनगर येथील आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुरेश चव्हाण यांची बदली झाली आहे.

चव्हाण यांनी मुंबई शहर व नागपुर शहर येथे काम केले आहे. या काळात गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून त्यांचा लौकीक आहे.

दरम्यान पाथर्डीतील रोज होणाऱ्या चोऱ्या, खिसेकापु व दागीने चोर, शहरातील बेशिस्तपना, रस्त्यावरील अतिक्रमणे अशी आव्हाने चव्हाण यांच्या समोर आहेत.