अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :- राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली. यामध्ये कृषी विद्यापीठाच्या शिक्षकांसह कर्मचाऱ्यांचा एक महत्वपूर्ण प्रश्न मार्गी लागला आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील कृषी विद्यापीठांमधील शिक्षकवर्गीय कर्मचार्‍यांना 7 वा वेतन आयोग लागू करण्यास मंजुरी देण्यात आली. यामुळे शिक्षकांसह कर्मचाऱ्यांमध्ये सकारात्मक वातावरम निर्माण झाले आहे.

या निर्णयाचा लाभ राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, अकोलातील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणिबाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ या चारही विद्यापीठातील शिक्षकवर्गीय कर्मचार्‍यांना लाभ होणार आहे.

राज्यातील कृषी विद्यापीठे संलग्न कृषी महाविद्यालये यामधील शिक्षकवर्गीय कर्मचार्‍यांना विद्यापीठ अनुदान आयोगाची सुधारित वेतन संरचना 1 जानेवारी 2016 पासून लागू करण्यास मान्यता देण्यात आली.