file photo

अहमदनगर Live24 टीम, 9 ऑगस्ट 2021 :- कोरोनाच्या धास्तीमुळे बीसीसीआयने आयपीएल २०२१ च्या उरलेल्या मॅचेसला १९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. युएईच्या दुबई, शारजाह आणि अबुधाबीमध्ये हे उरलेले ३१ सामने होणार आहेत.

या मॅचेस सुरुऊ झाल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नये यासाठी पुरेपूर काळजी घेतली जात आहेत. यामुळे बीसीसीआयने आयपीएलच्या नियमातही अनेक बदल केले आहेत.

इनसाईड स्पोर्ट्सने दिलेल्या बातमीनुसार मॅच खेळताना बॉल स्टॅण्डमध्ये गेला, तर तो बॉल पुन्हा खेळण्यासाठी वापरला जाणार नाही, त्याऐवजी दुसरी बॉल घेऊन मॅचला सुरुवात होईल.

असा नियम करण्यात आला आहे. याबरोबरच स्टॅण्डमध्ये गेलेल्या बॉलला सॅनिटाईज करून लायब्ररीमध्ये ठेवलं जाई, असे स्पष्ट करण्यात आले आहे.आयपीएलच्या या मोसमाचे दुसरे सत्र १९ सप्टेंबरपासून १५ ऑक्टोबरपर्यंत होणार आहे.

या ३१ मॅचपैकी १३ मॅच दुबईमध्ये, १० मॅच शारजाहमध्ये आणि ८ मॅच युएईमध्ये खेळवल्या जातील. यातील दुपारच्या मॅच भारतीय वेळेनुसार दुपारी ३:३० वाजता आणि संध्याकाळच्या मॅच ७:३० वाजता सुरू होतील.