file photo

अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :- आपण सगळेच आपल्या अन्नात मीठ वापरतो. पण तुम्हाला माहिती आहे का की, जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने अनेक आजार उद्भवू शकतात.

जास्त मीठ खाल्ल्याने उच्च रक्तदाब आणि हृदयविकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. एवढेच नव्हे तर, अधिक प्रमाणात मीठ कर्करोगासारख्या गंभीर आजारांना निमंत्रण देते. अशा परिस्थितीत आपण किती मीठ खात आहात, हे जाणून घेणे महत्वाचे आहे. मिठाच्या अतिसेवनाने अनेक गंभीर आजारांना निमंत्रण मिळू शकत. जाणून घेऊयात या बद्दल .

१) हृदयरोगास आमंत्रण :- मिठाच्या अतिसेवनाने हदयातील स्नायूपेशींवर ताण निर्माण होऊन त्या ताणल्या जातात. यामुळे हदयातील पेशी आपोआप वाढू लागतात आणि हदयाच्या कार्यामध्ये अडथळा आणतात. यानंतर मात्र हदयातील कित्येक भाग हे योग्य कार्य करण्यास सक्षम राहात नाहीत. त्यामुळे हदयाशी निगडीत अनेक रोग काही आपल्याला काळातच जडू लागतात.

२) उच्च रक्तदाब :- मिठाच्या अतिसेवनाने उच्च रक्तदाब संभवतो. या आजाराला हायपरटेन्शन असेही म्हटले जाते. मिठाच्या अतिसेवनाने अगदी सहजरित्या रक्तदाब वाढू लागतो.

३) मुतखडा :- योग्य वेळेत लघवीला न गेल्यास किंवा जास्त काळ लघवी अडवून धरल्यास किडनीमध्ये युरिनचा खडा वाढू लागतो. तसेच मिठाचे अतिसेवन करण्याने देखील ही समस्या डोके वर काढू लागते. ज्या लोकांना खूप आधीपासूनच मुतखड्याचा त्रास आहे त्या लोकांनी तर आवर्जून जेवणात मीठ अधिक खाणे टाळले पाहिजे.

४) पोटाचा कर्करोग :- ज्या लोकांना आहारात आणि आहाराव्यतिरिक्त सलाड, फ्रुट सलाडच्या माध्यमातून मिठाचे अधिक सेवन करण्याची सवय आहे त्या लोकांना पोटाचा कर्करोग होण्याची शक्यताही अधिक प्रमाणात असते. त्यामुळे मिठापासून चार हात लांब रहा आणि शरीरातील प्रत्येक अवयवास सुदृढ आणि निरोगी बनवा.

आहारातील मीठ कमी करण्यासाठी :-

– जेवण करताना भाजी, आमटी, कोशिंबीर व इतर पदार्थांत मीठ बेताचे घालावे.

– जेवताना पानात वेगळे मीठ घेऊ नये.

– जेवणात लोणची, पापड, चटण्यांचा समावेश कमी करावा किंवा लोणची आणि चटण्या घरी करून त्यात कमी प्रमाणात मीठ घालावे. विकतचे लोणचे किंवा चटण्या खाणे अयोग्य आहे. त्यात टिकवण्यासाठी मिठाचे प्रमाण जास्त असते.

– जेवण चविष्ट करण्यासाठी मीठ कमी अन् विविध मसाले घालावेत.

– चाट मसाल्याचे प्रमाण कमी असावे. खडे मीठ किंवा सैंधव मीठ जरी साध्या मिठापेक्षा चांगले असले तरी त्याचा वापरसुद्धा बेताचा आणि मोजका करावा.