अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :-  शेवगाव तालुक्यातील ठाकुर पिंपळगाव येथील नदीच्या वाहत्या पाण्यामध्ये वाहुन येत पुलाच्या नळ्यांना दोन मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे आत्महत्या का घातपात याची याबत उलट सुलट चर्चा असून संबंधित महिलेला पती घटना घडल्यापासून पसार झाल्याने संशय व्यक्त होत आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त असे कि ठाकूर पिंपळगाव येथे शेवगाव गेवराई राज्यमार्गावरील नदीच्या बंधाऱ्या  नजीक पुलावर आज सकाळी दोन एक मुलगा व महिलेचे प्रेत नागरिकांना दिसून आल्याने नागरीक व दुरक्षेत्राचे पोलीस राजू ढाकणे, नेताजी मरकड या पोलीसांनी ते मृतदेह बाहेर काढले असून ते गावातील एक महिला व मुलाचे असल्याचे निदर्शनास आले.

ही महिला व मुलगा काल दुपारी तिच्याच पती व एका महिलेबरोबर बाहेर गेल्याचे तिच्याच मुलीने पोलीसांना सांगितले. मात्र ही आत्महत्या की हत्या याबाबत तर्तवितर्क लावले जात असून पोलीसांनी मात्र अकस्मात गुन्हयाची नोंद केली आहे. पती ही घटना झाल्यानंतर फरार झाला आहे. त्याला ताब्यात घेतल्यानतंर या घटनेचा तपास लागणार आहे. ज्योती अंबादास सोनवणे (वय-२९) व दिपक अंबादास सोनवणे (वय-८) असे मृत्यांचे नाव आहे.

ज्योती व दिपक सोनवणे हे आई, मुलगा पती अंबादास सोनवणे व महिला असे चार जण घरामधून काल रविवार दि ८ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास बाहेर गेले होते. रात्री उशीरा अंबादास सोनवणे हे एकटेच घरी आले.

त्याने मुलगी प्रियंका हीच्याकडे तुझी आई व मुलगा घरी आले नाही का असे विचारले. ती नाही म्हटल्यावर प्रियंका हीला घेवून अंबादास सोनवणे हे बोधेगाव पोलीसदुरक्षेत्र मध्ये जावून ज्योती व दिपक सोनवणे हे काल रविवार दि ८ रोजी दुपार पासून गायब झाले असल्याची माहिती दिली.

मुलीला घरी सोडून ते काल आईला व मुलाला पाहतो असे सांगून घरामधून निघून गेले. ते पुन्हा घरी आले नाहीत. गावातील नागरीक व नातेवाईकांनी परिसरात शोधाशोध केली मात्र माय लेकरं कुठेही सापडले नाहीत. रात्री परिसरात

पाऊस झाल्याने सकाळी शेवगाव- गेवराई राज्यमार्गावरील ठाकुर पिंपळगाव नदीला पाणी आले. त्यामध्ये नागरीकांना दोन मृतदेह वाहत येवून पुलाच्या नळयांमध्ये अडकलेले आढळून आले.

याबाबत नागरीकांनी पोलीसांना याची माहिती दिली. पोलीस व नागरीकांनी दोन्ही मृतदेह बाहेर काढले असता त्यांना ते ज्योती व दिपक सोनवणे यांचे असल्याचे निदर्शनास आले.

याबाबतची माहिती परिसरात पसरल्याने मृतदेह पाहण्यासाठी नागरीकांची मोठी गर्दी झाली होती. दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शेवगाव येथील ग्रामिण रुग्णालयात आणले.

त्यानंतर दोन्ही प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात दिले सदर महिलेच्या माहेरील सुकळी ता नेवासा येथील नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती पोलीसांनी याबाबत अकस्मात गुन्हयाची नोंद केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा करीत आहेत.

सोनवणे हे कुटूंब दोन तीन वर्षापूर्वी ऊस तोडणी करत होते. सध्या मात्र ते मोलमजूरी व शेती करुन कुटूंबाचा उदर्निवाह करीत होते. घरामध्ये पती पत्नीचे एका महिलेवरुन सतत वाद होत असल्याचे मुलगी प्रियंका हीने सांगितले.

काल दुपारी पत्नी व मुलाला घेवून सोनवणे कुठे गेले होते. त्यानंतर ज्योती सोनवणे व दिपक सोनवणे या आई व मुलाने नेमकी आत्महत्या केली की त्यांची हत्या करण्यात आली. याबाबत गावामध्ये उलटसुलट चर्चा सुरु होता.

या घटनेनंतर अंबादास सोनवणे हे पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. अंबादास याला ताब्यात घेतल्यानंतर या घटनेचा उलगडा होणार आहे.या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.