अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आद्यपही कायम आहे. तसेच सध्या स्थितीला जिल्ह्यात कोरोनाबाधितांची आकडेवारी वाढू लागली असल्याने अनेकांनी याचा चांगलाच धसका घेतला आहे.

कोरोनामुळे गेल्या वर्षभर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा प्रत्यक्ष सभागृहात झालेली नाही. मध्यंतरी कोरोना संसर्ग कमी झाल्याने शासनाने सभागृहात बैठका घेण्यास परवानगी दिली.

त्यामुळे २६ फेब्रुवारीला होणारी सर्वसाधारण सभा प्रशासनाने जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित केली होती. परंतु दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा सार्वजनिक कार्यक्रमांना मनाई केली, तसेच सभेला ५० पेक्षा जास्त जणांना उपस्थित राहण्यास निर्बंध घालण्यात आले.

त्यामुळे २६ ला होणारी सर्वसाधारण सभा पूर्वीप्रमाणेच व्हिडिओ काॅन्फरन्सद्वारे होणार असल्याचा निर्णय अध्यक्षा राजश्री घुले व सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी घेतला.

जि.प. सदस्यांनी आपापल्या तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयातून या सभेत सहभागी व्हावे, असेही या निर्णयात म्हटले आहे.

ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb

अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर