Success Story: प्रतिभा किंवा हुशारी किंवा आपण त्याला कसब म्हणू हे संसाधनांच्या अधीन नसते, टॅलेंट स्वतःचा मार्ग स्वतः शोधते.

अशाच एका प्रतिभेचे जिवंत उदाहरण राजस्थानमधील (Rajasthan) अलवरमध्ये पाहायला मिळाले आहे. अलवर मधील एका गरीब कुटुंबातील मुलीने साधनांविना 12वी कला शाखेत 93 टक्के गुण मिळवून देशभरात आपल्या कुटुंबाचा नावलौकिक कमावला आहे.

हे यश आणखीनच खास बनते कारण रवीना ज्या कुटुंबातून आली आहे त्यांच्याकडे वीज कनेक्शन घेण्यासाठी देखील पैसे नाहीत. वडिलांचा हात डोक्यावर नाही, त्यामुळे कुटुंबाला हातभार लावण्यासाठी रवीनाने दिवसा शेळ्या चारत (Goat Rearing) आणि रात्री मोबाईलच्या उजेडात अभ्यास करून हे यश मिळवले आहे. चला तर मग जाणून घेऊया रवीनाच्या संघर्षाची कहाणी.

शेळीपालन (Goat Farming) करणारी मुलगी बारावीत अव्वल:- गढी मामोद हे गाव राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात येते आणि या गावात राहणाऱ्या होतकरू तरुणीचे नाव रवीना आहे.

गावातील सरकारी शाळेत शिकणाऱ्या 17 वर्षीय रवीना गुर्जरचे वडील रमेश यांचा 12 वर्षांपूर्वी सर्पदंशाने मृत्यू झाला होता. आई हार्ट पेशंट असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत.

गावात बांधलेल्या झोपडीसारख्या एका छोट्याशा घरात संपूर्ण कुटुंब राहतं. रवीनाच्या कुटुंबाची गरिबी अशी आहे की वीज कनेक्शन घेण्यासाठी पैसे नाहीत.

रवीनाने लाल टेनमध्ये म्हणजेचं दिव्याच्या उजेडात अभ्यास करून हे यश मिळवले हे ऐकून कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. रवीना घरातील कामांसोबतच लहान भावंडांचीही काळजी घेते.

यानंतर ती शेळ्या देखील चारते. दिवसा सर्व कामे करून रात्री मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात 3 तास ​​अभ्यास करत या तरुणीने बारावीत टॉप केल आहे. चार भावंडांमध्ये रवीनाच्या मोठ्या बहिणीचे लग्न झाले आहे. एक बहीण आणि एक भाऊ लहान आहे.

रवीना ही कुटुंबातील तिसरी मुलगी आहे. घरच्या जबाबदाऱ्या पार पडल्यानंतरही रवीनाने आपले ध्येय सोडले नाही. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कि, रवीनाच्या कुटुंबाची परिस्थिती अशी आहे की, पलानहार योजनेतून केवळ 2000 रुपयांमध्ये घराचा खर्च भागतो.

त्यांना शिक्षणासाठी फिरते बाल आश्रम शाळा चालवणारे नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांचे सहकार्य लाभले. आणि आता या मुलीने 93 टक्के गुण मिळवून नारायणपूर उपविभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

अभिनंदन करण्यासाठी पोहोचले गाववाले :- जेव्हा व्यक्ती यशस्वी होतो, तेव्हा त्याची सर्वदूर चर्चा ऐकू येते. रवीनासोबतही असंच काहीसं घडतंय.

गावातील एक सामान्य मुलगी, जी आजच्या आधी फक्त “बकरी चारणारी” म्हणून ओळखली जात होती, पण आज संपूर्ण गाव रवीनाच्या यशाबद्दल अभिनंदन करताना थकत नाही.

प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास करून अव्वल ठरलेल्या रविना गुर्जरच्या गावात चर्चा सुरू आहे. प्रत्येकजण मुलांना त्याच्याकडून शिकण्यास सांगत आहेत. रवीना गुर्जरला पोलीस सेवेत रुजू होऊन जनतेची सेवा करायची आहे. निश्चितच रवीना यांनी मिळवलेले हे यश इतरांना प्रेरणा देणारे आहे.