ळेवर पगार न मिळाल्यामुळे एसटीचे कर्मचारी आत्महत्या करत आहेत या आत्महत्येस शासनच जबाबदार असुन कर्मचाऱ्यांंच्या आत्महत्येस जबाबदार असणारावर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे यांनी केले आहे.

नुकतेच श्रीरामपूर एस टी आगारात एसटी कामगारांच्या संपाला मनसेच्या वतीने पदाधिकाऱ्यानी जाहीर पाठींबा दिला आहे. यावेळी आगारप्रमुखांना निवेदन देखील देण्यात आले आहे.

मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे म्हणाले की कामगारांना लवकरात लवकर न्याय मिळावा.तसेच एसटी ड्रायव्हर कंडक्टर हे ऊन वारा वादळ कुठलाही प्रसंग असला तरीपण आपली सेवा योग्य रीतीने देत असतात.

राज्यातील रस्त्यांची अवस्था अतिशय खराब असताना एसटी ड्रायव्हर कंडक्टर आपला जीव मुठीत घेऊन अहोरात्र प्रामाणिकपणे आपले कर्तव्य प्रामाणिक पणाने पार पाडतात. तरी राज्य सरकार त्यांना म्हणावे तश्या सुविधा देत नाही आहे.

तसेच इतरां पेक्षा कमी पगार देत असते. राज्य सरकार भ्रष्टाचार करण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाचा समावेश राज्य सरकार स्वतः कडे विलगीकरण करून घेत नाही.

यामुळे आम्ही या आंदोलना मध्ये सक्रिय सहभाग घेऊ व महाराष्ट्र सरकारला तुमच्या मागण्या मान्य करण्यास भाग पाडू असे आश्वासन जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे यांनी दिले. कामगारांना पाठींब्याचे पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आले.