file photo

अहमदनगर Live24 टीम, 9 ऑगस्ट 2021 :- वीज प्रकल्प उभारण्याचे काम सुरू असून या कामात ओढणी करण्यासाठी लागणारी वायर चोरणाऱ्या एका चोरट्याला स्थानिक लोकांनी रंगेहाथ पकडले. हि घटना कर्जत तालुक्यातील सिद्धटेक येथे घडली आहे.

ग्रामस्थांनी चोरट्याला तात्काळ पोलिसांकडे सुपूर्द केले. याबाबत अधिक माहिती अशी कि, कर्जत तालुक्यातील टाकळी कडेवळीत येथील हा चोरटा असून राशीन उपकेंद्रात आणण्यात आले.

मात्र त्याविरुद्ध कोणी फिर्याद दाखल केली नाही. त्यामुळे प्रतिबंधात्मक कारवाई करून त्याला सोडून देण्यात आले. घटना घडताच पोलीस पाटील यांनी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना हा प्रकार सांगितला.

त्यानंतर यादव यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेमार्फत या घटनेची माहिती ग्रामस्थांना दिली. दोन चोरटे भांबोरा गावाच्या दिशेने गेल्याची माहिती देत ग्रामस्थांना चोरटे पकडण्यासाठी मदत करण्याचे आवाहनही त्यांनी केले होते. गुन्हेगारी रोखण्यासाठी ग्रामसुरक्षा यंत्रणा ही उपयुक्त ठरत आहे.