अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :- कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणावर झालेल्या विकास कामांना मागील दोन वर्षापासून तालुक्याच्या विकासासाठी मिळत असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या निधीतून विकासाने वेग घेतला असून विकासाची गती थांबणार नाही असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी एका कार्यक्रमात केले.

कोपरगाव तालुक्यातील मढी खुर्द येथील ग्रा.मा. १०४ सा. क्र. ०.६०० येथे सी.डी. वर्क करणे व मढी खुर्द ते पाथरे जिल्हा हद्द रस्ता खडीकरण करणे कामाचे व मढी बु. येथे प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरील सी.डी. वर्क करणे व मढी बु. ते कोळगाव रस्ता खडीकरण करणे कामाचे भूमिपूजन तसेच आमदार आशुतोष काळे यांच्या स्थानिक विकास निधीतून रामा ३० ते सचिन खर्डे घर रस्ता खडीकरण कामाचे लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते.

पुढे बोलतांना आमदार आशुतोष काळे म्हणाले की, ग्रामीण भागातील जनतेने साडेचार वर्षापूर्वी मोठ्या विश्वासाने दिलेल्या जबाबदारीतून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासाला गती मिळाली त्या विकासाच्या बळावर सुज्ञ मतदारांनी मला विधानसभेत निवडून दिले. त्यामुळे कोपरगाव तालुक्यात रस्ते, वीज आणि पाणी आदि समस्या सुटण्यास मदत झाली आहे.

विद्यमान जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सर्वच सदस्यांनी प्रामाणिकपणे काम करून विकासाचा डोंगर उभा केला आहे. व मागील दोन वर्षापासून महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून तालुक्याच्या विकासासाठी मिळत असलेल्या कोट्यावधी रुपयाच्या निधीतून विकासाचा वेग अजूनच वाढलेला आहे. यापुढेही विकासाची हि गती थांबणार नाही अशी ग्वाही दिली.

मतदार संघाच्या विकासाच्या विविध समस्या आहेत.या समस्या बहुतांशी प्रमाणात सोडविण्यात यश मिळाले असून यापुढील काळातही सर्व समस्यांचा निपटारा करून तालुक्याच्या विकासाचा रथ प्रगतीपथावर ठेवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी पंचायत समिती उपसभापती अर्जुनराव काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकरराव रोहोम, संचालक सुनील शिंदे,

आनंदराव चव्हाण, संभाजीराव काळे, माहेगाव देशमुख सोसायटीचे चेअरमन रवींद्र काळे, उपसरपंच बाळासाहेब पानगव्हाणे, भास्करराव काळे, मच्छिंद्र जाधव, प्रकाश काळे, रोहिदास होन, राहुल रोहमारे, देवेन रोहमारे, नंदकिशोर औताडे, राजेंद्र औताडे, देर्डेचे सरपंच योगिराज देशमुख, मढी बु.चे सरपंच प्रवीण निंबाळकर, उपसरपंच सौ. रेखाताई गवळी, मढी खु.चे सरपंच सुनील भागवत, नरहरी रोहमारे, श्रीधर आभाळे,

सोपानराव गवळी, भाऊसाहेब कुऱ्हाडे, उत्तमराव कुऱ्हाडे, बिपीन गवळी, अशोक गवळी, प्रमोद आभाळे, रवींद्र आभाळे, आबासाहेब आभाळे, भरत आभाळे, आण्णासाहेब गवळी, राजेंद्र कुऱ्हाडे

प्रकाश गवळी, सुभाष गवळी, सुनील मोकळ, रामराव गवळी, नवनाथ चव्हाण, संतू गवळी, वसंतराव आभाळे, दिलीप काळे, वसंतराव जाधव, संदीप जाधव, विकास जाधव, विनायक जाधव, संजय खैरनार, वैभव जाधव, अमोल जाधव, सुमित जाधव, संदीप बरसे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, उपअभियंता उत्तमराव पवार, शाखा अभियंता दिघे, ग्रामविकासअधिकारी अशोक नेवगे, श्रीमती नजन, तसेच ग्रामस्थ आदी उपस्थित होते.