file photo

अहमदनगर Live24 टीम, 7 ऑगस्ट 2021 :- पावसाअभावी ३० हजार हेक्टरवरील खरीप पिके धोक्यात आली आहेत. पावसाने ओढ दिल्याने पिकांची वाढ थांबली आहे. रोगराईची कीड लागली आहे.

त्यामुळे यंदाही पुन्हा उत्पन्नाबाबत शंका निर्माण झाली आहे.आता शेतकऱ्यांना श्रावण सरीची आस लागली आहे. कुठे अतिवृष्टी कुठे जोरदार ते मध्यम स्वरूपाच्या विसंगत पावसात खरीप पिकांच्या पेरण्या उरकल्या आणि पिकांची जोमात वाढ होणार त्यावेळी पावसाने ओढ दिली.

महिन्यापासून पाऊस नसल्याने पिके सुकू लागली आहेत. शेवगाव तालुक्यात जवळपास ५४ हजार हेक्टरवर कपाशी, तुर,बाजरी, मुग, उडिद,सोयाबीन, भुईमुग अशा खरीप पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत. यात सर्वात जास्त कपाशी ३३ हजार ७११, तुर १२ हजार ७२०, बाजरी ३ हजार ६०१ हेक्टर पेरण्या झाल्या आहेत.

पावसाअभावी ३० हजार हेक्टरवरील खरीप पिके धोक्यात आली आहेत. आषाढात पावसाने ओढ दिली. आता श्रावण मास सुरु होत आहे. त्यामुळे श्रावण सरी बरसतील हा आनंद तयार होत असतानाच हवामान विभागाने १५ ऑगस्ट नंतर पावसाचा अंदाज वर्तवल्याने मध्यतंरीच्या दहा दिवसात काय होणार याची चिंता शेतकऱ्यांना आहे.