अहमदनगर Live24 टीम, 1 ऑगस्ट 2021 :-सर्वसामान्यांपासून अनेकांचे महत्वाचे कामे सरकारी कार्यालयात असतातच. यातच आपले काम करून घ्यायचे असेल तर सरकारी बाबुला खुश करावेच लागते नाहीतर काम कसे होणार …. हे आता नित्याचेच झाले आहे.
जगभरात कोरोनाचे संकटाने मानवाला जर्जर करून सोडले मात्र या काळातही लाचखोरीत नेहमीच सर्वात पुढे असणारा सरकारी विभाग म्हणजे महसूल विभाग यंदाही या शर्यतीत आपले स्थान कायम राखण्यात यशस्वी ठरला आहे.

गेल्या साडेपाच वर्षांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्ह्यात तब्बल १७५ सापळा कारवाई करत लाचखोर लोकसेवकांना जेरबंद केले आहे.
ज्या लाचखोर लोकसेवकाविरोधात तक्रार केली जाते ते लाचलुचपतच्या सापळ्यात अडकतात; मात्र असे अनेक जण आहेत जे सरकारी कामाचे पैसे घेतात, मात्र सापडत नाहीत.
२०१६ मध्ये जिल्ह्यातील विविध सरकारी कार्यालयांतील तब्बल ४१ जण लाच घेताना रंगेहाथ सापडले. कोरोनाकाळात २०२० मध्ये ३२ कारवायांत ३७ जण तर जुलै २०२१ पर्यंत २१ कारवायांत २८ जणांवर लाचेची कारवाई झाली आहे.
यातून लॉकडाऊनकाळातही लाचखोरी जोमात असल्याचे पाहावयास मिळाले. क्लासवन अधिकाऱ्यांपासून ते चतुर्थ श्रेणीतील कर्मचारीही लाच घेताना अडकले आहेत.
‘महसूल विभाग’ ठरला अव्वल :- महसूल विभागामध्ये नागरिकांचा सततचा संपर्क येत असतो. जमिनीचे वाद, वारसनोंदी अशा प्रकारची सततची कामे महसूल विभागात असतात.
कार्यालयात कामे घेऊन येणारे हे सर्वसामान्य शेतकरी असतात. या शेतकऱ्यांचे अज्ञान हेरून त्यांच्याकडे पैशांची मागणी केली जाते.
एखादा शेतकरी चाणाक्ष निघाल्यासच तो लाचलुचपतकडे धाव घेतो. अन्यथा निमूटपणे पैसे देऊन काम मार्गी लावण्यास प्राधान्य दिले जाते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम