file photo

अहमदनगर Live24 टीम, 5 ऑगस्ट 2021 :- गळफास लावून आत्महत्या करणाऱ्या तरूणाची गळफास घेताना दोरी तुटल्याने या तरुणाचे प्राण वाचल्याची घटना मंगळवारी राहाता तालुक्यातील प्रवरानगर येथे घडली.

प्रवरानगर येथील संतोष नरोडे (वय 30) येथील प्रवरा कॅन्टीनमध्ये काम करणारा कामगार याने मंगळवारी सकाळी कामाला आल्यानंतर काही वेळातच कॅन्टींग चालकाला काही न सांगता बाहेर निघून गेला. जाताना सोबत त्याने एक नवीन नायलॉन दोरी विकत घेतली.

प्रवराबगर्सयेथील नेहरू पुलाजवळ असलेल्या वसाहतीच्या मागे असलेल्या झाडाला नायलॉनच्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेत असताना दोरी तुटली आणि तो जमिनीवर पडला. घटनेची माहिती मिळताच कारखान्याचे सुरक्षा अधिकारी शरदराव मुळे,

जमादार बाबासाहेब तांबे व सुरक्षा कर्मचारी महेश मिरपगार यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन संदीपला उचलुन दवाखान्यात नेले उपचारानंतर त्याला कारखाना मेन गेटवर आणून सुरक्षा अधिकारी शरद मुळे यांनी संदीपचे समुपदेशन केले व त्याच्या नातेवाईकांना व कॅन्टींग चालकाला झालेल्या प्रकाराची माहिती दिली. नंतर ते संदीपला लोणी पोलीस स्टेशनला घेऊन गेले.