अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :- श्रीरामपूर येथील बेलापूर रेल्वे स्थानक परिसरात महाराष्ट्र एक्सप्रेस रेल्वेमध्ये चोरी करण्यासाठी घुसलेल्या चोरट्याचा प्रवाशांनी आरडाओरड केल्याने दरवाजातून बाहेर उडी मारल्याने मनमाडकडून अहमदनगरकडे जाणाऱ्या हबीबगंज एक्सप्रेस रेल्वे इंजिनच्या धडकेत मृत्यू झाला.

मुजाहिद मस्तान शेख (वय २०, रा. फकिरवाडा, श्रीरामपूर) याचा सकाळी रेल्वे स्थानक परिसरात एकाचा मृतदेह आढळला. पोलिस निरीक्षक संजय सानप यांच्या पोलिस पथकाने घटनास्थळी जावून पहाणी केली.

त्यानंतर पोलिसांनी चौकशीसाठी शहरातून जुबेर हरुण शेख (वय २०, रा. डावखर रोड), इरफान मैनुद्दिन सय्यद ऊर्फ काझी ऊर्फ इप्या (वय १८, रा. मिल्लतनगर), अरबाज जब्बर शहा (वय २२, रा. फकिरवाडा) तसेच आदम युसुफ शहा (वय २५, रा. काझीबाबा रोड) चौघांना ताब्यात घेतले.

चौकशी दरम्यान, मृत मुजाहिद मस्तान शेख हा वरील साथीदासह चोरी करण्यासाठी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास येथील बेलापूर रेल्वेस्थानकात गेला होता.