file photo

अहमदनगर Live24 टीम, 25 जुलै 2021 :- भंडारदरा पर्यटनाला अहमदनगर जिल्ह्यातील मद्यपी पर्यटकांकडून गालबोट लागले आहे . महाराष्ट्राची मिनी काश्मीर म्हणून ओळख असणाऱ्या अकोले तालुक्यातील भंडारदरा परिसरात पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

मात्र,मद्यपी आणि व्यसनाधिन पर्यटकांमुळे स्थानिक नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी पोेलिसांवर हल्ला झाला होता. तर आता पुन्हा दोन हॉटेल चालक आणि एका महिलेचा विनयभंग करून तिला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

तू फार चांगली दिसते म्हणून श्रीरामपूर तालुक्यातून आलेल्या पर्यटकांनी थेट एक महिलेला मिठी मारुन विरोध केल्याने तिचा बुचूडा धरुन समोरच्या टेबलावर अपटला. तसेच एवढ्यावरच न थांबता त्याने तेथील टपरीतील अंड्याचे ट्रे, बिसलेरी बॉक्स, कढाईतील तेल, दुधाचा कॅन,

गॅसची शेगडी व इतर साहित्य फेकून देत स्टॉलमधील सामानाची नासधूस केली. याप्रकरणी सहा जणांवर राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत आरोपी श्रीराम केशव जंगले (वय 26 रा. पुर्णवाद नगर वार्ड क्रमांक 07 श्रीरामपुर)

अक्षय प्रभाकर गाडेकर (वय 28 रा. श्रीरामपूर) उमेश अशोक धनवटे (वय 31, रा. श्रीरामपुर),सुमित दत्तात्रय वेताळ (वय 27, रा. श्रीरामपूर) वैभव किशोर हिरे (वय 24, रा श्रीरामपूर),

विशाल रामकृष्ण वेताळ (वय 24 रा. श्रीरामपूर) अशा सहा जणांना आरोपी करण्यात आले आहेत. पुढील तपास स.पो.नि.नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन खैरनार आदी करत आहेत.