अहमदनगर – पाथर्डी तालुक्यातील मोहरी येथे बैलगाडीच्या चाकाखाली सापडून एका बारा वर्षीय मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. योगेश सोमनाथ नरोटे असे मयत मुलाचे नाव आहे. या दुर्दवी घटनेबाबत समजताच परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जाऊ लागली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, बुधवार रोजी दुपारच्या सुमारास योगेश त्यांच्या स्वतःच्या मालकीची बैल गाडीतून शेतामधून गुरासाठी चारा घेऊन घराकडे जात होता.

दरम्यान त्यांच्या राहत्या घराजवळच योगेश हा बैलगाडीतूनखाली पडला. त्यावेळी डोक्यावरून बैलगाडीचेचाक गेल्याने मोठा रक्तश्राव होऊन त्यात मृत्यू झाला.

दरम्यान घटनेनंतर तात्काळ उपचारासाठी पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र योगेशचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.

योगेशचे वडिल शेतकरी आणि गरीब कुटुंबातील आहे. त्या कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळल्याने तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे.