file photo

अहमदनगर Live24 टीम, 24 जुलै 2021 :-   नगर जिल्ह्यातील सांडवे या गावातील शिंदे ट्रांसफार्मर 100 के.व्हीं लवकरात लवकर बदलून देण्याच्या मागणीसाठी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने अतिरिक्त कार्यकारी अभियंता कन्हैयालाल ठाकूर यांना निवेदन देण्यात आले.

मौजे सांडवे येथील शिंदे 100 के व्ही ट्रान्सफॉर्मर मागील दोन ते तीन महिन्यापासून बंद आहेत. त्यामुळे उत्तम पाऊस होऊन देखील पाणी उपसा करता येत नाही. परिणामी शेतकऱ्यांच्या फळबागा व पिके पाण्या अभावी जळून जाण्याची भीती निर्माण झालेली आहे.

गावातील शेतकऱ्यांची आपल्या कार्यालयाकडे दीड महिन्यापूर्वी अर्ज करून देखील आपण अद्याप पर्यंत कुठल्याही प्रकारची मदत केलेली नाही किंवा ट्रान्सफर वर दुरुस्त अथवा बदली करून दिलेला नाही. गावामध्ये रात्री संपूर्ण अंधार होत असून शेतकऱ्यांच्या घरांमध्ये देखील लाईट नाही.

हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना आंदोलनाशिवाय कुठलाही पर्याय उरलेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांची अशीच पिळवणूक करत असाल आणि आपण येणाऱ्या पंधरा दिवसानंतर ट्रान्सफर दुरुस्त अथवा बदलून न दिल्यास आम्ही शेतकऱ्यांचे आपल्या कार्यालयावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे समवेत नगर जिल्हा युवक अध्यक्ष बापू खांदवे, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष दीपक गुगळे, अमित गांधी, शहराध्यक्ष शहानवाज शेख, गौतम सातपुते, अतुल पवार आदी उपस्थित होते.