पाथर्डी शहरात चोरटयांनी धुमाकूळ घातला आहे. शहरातील विजयनगर, आनंदनगर भागात राहणारे किसन आव्हाड, सागर पोटे, जगन्नाथ बरशिले यांच्या राहत्या घरी तर सुभद्रा भोसले यांनी भाड्याने दिलेल्या भाडेकरूंच्या घरी चोरी झाली आहे.

उपनगरत घरफोड्या झाल्याने नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत किसन महादेव आव्हाड रा.विजयनगर पाथर्डी यांनी फिर्याद दिली असून याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी दाखल फिर्यादीमध्ये म्हंटले आहे, दिवाळी व भाऊबीजेच्या सणाच्या निमीत्ताने गावी कुटुंबासह गेलो होतो. घरी आल्यावर हॉलचा लोखंडी दरवाजा व लाकडी दरवाजाचे कुलुप तोडून हॉल मधील कपाटातील सामानाची उचकापाचक केली होती.

यामध्ये रोख रक्कम दोन लाख, पाच तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या, दोन तोळ्याचे नेकलेस असा एकूण ३,४०,०००/- अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलुप तोडून घरफोडी करून ऐवज पळवला आहे.

आव्हाड यांच्या जवळ राहणारे प्रदिप बाबुराव भोसले, सुभद्रा भोसले यांनी भाड्याने दिलेल्या भाडेकरूच्या घरी तसेच सागर रामराव पोटे यांच्या घरीही चोरी झाली.

रम्यान आनंदनगर येथील जगन्नाथ बरशिले यांच्या बंद घराच्या दरवाज्याचे कोयंडा तोडून अज्ञात चोरटयांनी चोरी केली आहे. या चोरीच्या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन रानशिवरे हे करीत आहे.