उद्योजकाचे संपर्क कार्यालय चोरट्यांनी फोडले

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :-राहुरी फॅक्टरी येथील दत्तनगर येथे चैतन्य मिल्कचे अध्यक्ष गणेश भांड यांच्या संपर्क कार्यालयाचे कडी कोयंडा तोडून सामानाची उचकापाचक केली तर याच भागात श्रावण भालेराव यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी २० हजार चोरून नेले आहे.

राहुरी फॅक्टरी भागातील दत्तनगर गुरुवारी मध्यरात्री चार ते पाच अज्ञात चोरट्यांनी बाहेरगावी अंत्यविधीसाठी गेलेल्या व मोलमजुरी करणाऱ्या श्रावण पोपट भालेराव यांच्या घराचे कुलूप तोडून घरात उचकापाचक करून २० हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली.

त्यानंतर चैतन्य मिल्कचे अध्यक्ष गणेश भांड यांच्या संपर्क कार्यालयाचा कडी कोयंडा तोडून कार्यालयात प्रवेश करून सामानाची उचकापाचक केली. त्यानंतर बराच वेळ चोरटे संपर्क कार्यालयाच्या बाहेरील झाडाझुडपात लपून बसले होते. गणेश भांड यांकब्या कार्यालय परिसरात असलेल्या सीसीटीव्हीमध्ये अज्ञात चार ते पाच चोरटे कैद झाले आहेत.

राहुरी पोलीस ठाण्यात श्रावण पोपट भालेराव यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चार ते पाच चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे..

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!