file photo

अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :- सोनईमध्ये चोरटयांनी धुमाकूळ घातला आहे. यामुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे,. नुकतेच चोरटयांनी जुना वांबोरी रस्त्यावर असलेल्या दत्तनगर परिसरात पहाटे दोन ठिकाणी घरफोडी केली आहे.

दरम्यान याबाबत पोलीस ठाण्यात उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, दत्तनगर परिसरात राहत असलेले संतोष मोहन कर्डीले (वय 37) यांनी फिर्याद दिली की सोमवारी पहाटे तीन वाजता किचनचा दरवाजा तोडून दोन चोरट्यांनी घरात प्रवेश करून लोखंडी टॉमी व लोखंडी कत्तीचा धाक दाखवत अगोदर घरातील सर्व चार मोबाईल तोडून घरातील एक तोळा वजनाचे सोन्याचे नेकलेस,

सहा ग्रॅमचे सोन्याचे कानातील वेल व रोख चार हजार रुपये चोरुन नेले. शेजारी राहणारे दिपक नामदेव जाधव यांच्या घरीही चोरट्यांनी तेरा ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी मंगळसूत्र, नऊ ग्रॅम वजनाचे कानातील वेल, दोन ग्रॅम वजनाची नाकातील नथ, अकरा ग्रॅम वजनाच्या दोन अंगठ्या, आठ ग्रॅम वजनाच्या कानातील बाळ्या, तीन भार वजनाचे चांदीचे पायातील पैंजण व नऊ हजार रुपये रोख असा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.

दरम्यान चलाख असलेल्या या चोरटयांनी चोर्‍या करताना जवळच्या सर्व घरांना बाहेरून कड्या लावल्या होत्या. याबाबत सोनई पोलीस ठाण्यातगुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे, सहाय्यक निरीक्षक रामचंद्र कर्पे, ज्ञानेश्‍वर थोरात यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास ज्ञानेश्‍वर थोरात हे करत आहे.