अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :-कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथील रहिवासी अरूण कदम यांंची एच एफ होस्टेन दुसऱ्या विताची पाच वर्ष वयाची गायीला १ लाख ६१ हजार रुपयांत खरेदी केले.

राहता तालुक्यातील निर्मळ पिंप्री येथील व्यापारी सिंकदर पठाण यांनी या गायीची खरेदी केले. गायीला चांगली किंमत मिळाल्याने शेतकरी अरुण कदम यांनी गुलालाची उधळण करत डीजेच्या तालात मिरवणूक काढत गायीला रवाना केले. गायीची पाठवणी करतांना मालकीणबाईच्या डोळ्यात अश्रु आल्याने गावकरीही भावूक झाले.

गुरुवारी दुपारी कदम यांची गाय वरील रकमेस विकली गेल्याची बातमी गावात पसरताच गाय व व्यापारी बघण्यास ग्रामस्थ गोळा झाले. गायीची शरीरयष्टी, रंग, उंची बघून प्रत्येक जण कदम यांचे कौतूक करत होता.

कदम म्हणाले, मागील विता मध्ये सत्ताविस तर या वेळेला तीस लिटरच्या पुढे गाय दूध देईल. गोठ्यात सर्व एच एफ होस्टेन जातीच्या गायी आहेत. खाद्य चारा पोषक घटकांचा समावेश खुराकात समावेश असतो. तालुक्यातील कोळपेवाडी येथील मध्यस्थी राजेंद्र महाजन व्यापारी पठाण व कदम यांचा गावकऱ्यांनी फेटा बांधून सत्कार केला.