अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- निवडणुकीमध्ये आम्हाला विखेंची साथ मिळालीच होती याबद्दल दुमत नाही. आमच्याकडे संख्याबळ नसल्यामुळे व ऐनवेळेला कॉंग्रेसने गटनेता बदलल्यामुळे आमचे संख्याबळ होऊ शकले नाही,

अशी स्पष्ट कबुली भाजपाचे जिल्हा परिषदेचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

हे पण वाचा :- आमदार निलेश लंके म्हणाले मंत्रिपदापेक्षा ही गोष्ट माझ्यासाठी महत्वाची !

अध्यक्ष -उपाध्यक्ष निवडीनंतर वाकचौरे बोलत होते विखेंचे पाठबळ आम्हाला मिळालेले होते पण दुसरीकडे भाजपचे संख्याबळ कमी होते.

हे पण वाचा :- राष्ट्रवादीचा हा नेता होणार अहमदनगरचा पालकमंत्री ?

जर विखे गटाचा गटनेता राहिला असता तर आम्हाला निश्‍चित याचा उपयोग झाला असता व आम्ही आकड्यांची जुळवाजुळव केली असती पण तसे होऊ शकले नाही.

हे पण वाचा :- या कारणामुळे प्राजक्त तनपुरे झाले मंत्री खुद्द शरद पवारांनीच दिले स्पष्टीकरण !

दुसरीकडे महाविकास आघाडीतल्या नेत्यांचा सुद्धा आमच्या नेत्यांशी संपर्क झाला व निवडणूक तुम्ही बिनविरोध करा अशी त्यांनी विनंती सुद्धा केली होती असे वाकचौरे यांनी स्पष्ट केले.

हे पण वाचा :- वाढदिवसाला आणली तलवार आणि नंतर झाले असे काही…

आमच्या वरिष्ठांनी या संदर्भातला निर्णय घेऊन अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक लढवायची नाही असे सांगितल्याने आमच्यामध्ये एकमत झाले व त्यानुसारच आम्ही या निवडणुकीतून माघार घेतली.

हे पण वाचा :- खासदार सुजय विखे म्हणाले ‘विखे पॅटर्न’ संपलेला नाही !

कॉंग्रेस पक्षाने विखे गटाचा गटनेता ऐनवेळी बदलल्यामुळे आम्हालाही खेळी करता आली नाही अशी कबुली सुद्धा त्यांनी दिली.

हे पण वाचा :- अहमदनगर ब्रेकिंग : सावेडीत हाय प्रोफाईल वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या अड्डाच्या पर्दाफाश

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com