Tomato Farming : भारतात गेल्या अनेक वर्षांपासून शेतीमध्ये मोठा बदल केला जात आहे. शेतकरी बांधव आता अल्प कालावधीत आणि अल्प खर्चात काढणीसाठी तयार होणाऱ्या पिकांची लागवड करू लागले आहेत. टोमॅटो या पिकाची देखील कमी खर्चात शेती केली जात असल्याने याचे मोठ्या प्रमाणात आपल्या राज्यात शेती पाहायला मिळते. विशेष म्हणजे टोमॅटो पिकाला बाजारात बारामाही मागणी असते.

अशा परिस्थितीत या पिकाची शेती शेतकऱ्यांसाठी फायद्याचा सौदा सिद्ध होत आहे. दरम्यान जाणकार लोकांच्या मते शेतकरी बांधवांनी या पिकाच्या सुधारित जातींची शेती केल्यास त्यांना यातून चांगली कमाई होणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण टोमॅटो पिकाच्या एका विशेष जाती विषयी माहिती जाणून घेणार आहोत.

आज आपण टोमॅटोच्या अशा जाती विषयी माहिती जाणून घेणार आहोत ज्या जातीच्या टोमॅटोची चाळीस हजार रुपये खर्च करून लागवड करता येणार आहे आणि यातून तब्बल दोन लाखांपर्यंतची कमाई होणार आहे. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.

टोमॅटोची सुधारित जात

पुसा सदाहरित :- टोमॅटोची ही एक सुधारित जात आहे. यां जातीच्या टोमॅटो पिकातून सरासरी उत्पादन किमान 300 क्विंटल प्रति हेक्टर मिळत असते आणि जास्तीत जास्त 450 क्विंटल प्रति हेक्टर पर्यंत उत्पादन मिळत असल्याचा दावा करण्यात आला आहे. निश्चितच अधिक उत्पादन मिळत असल्याने या जातीची शेती शेतकऱ्यांसाठी फायद्याचा सौदा सिद्ध होणार आहे.

पुसा सदाहरित जातीच्या टोमॅटो पिकाची विशेषता खालीलप्रमाणे 

यां जातीच्या टोमॅटो पिकाची फुले आल्यानंतर वाढ खुंटते.

वनस्पती उंचीने लहान, फळ-गोल, एक लहान गोंडस आकर्षक फळ.

थंड आणि गरम वातावरणासाठी योग्य.

उंचीने कमी असते आणि यां जातींचे टोमॅटो पीक थंड आणि गरम तापमान सहन करते.

याला 10 ते 12 दिवसांत पाणी द्यावे लागते व त्याचे पीक 55 दिवसांत तयार होते. निश्चितच अल्पकालावधीत काढणीसाठी तयार होणाऱ्या या पिकातून शेतकऱ्यांना बक्कळ कमाई होण्याची शक्यता निर्माण होते.

उत्पन्न आणि खर्च

एक हेक्टरमध्ये या जातीच्या टोमॅटो पिकाची लागवड करण्यासाठी सुमारे 20,000 रुपये खर्च येतो आणि त्यातून 90,000 रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते. म्हणजेच पाच एकर शेत जमिनीत या जातीच्या टोमॅटो पिकाची लागवड करून शेतकरी बांधव जवळपास दोन लाखांच उत्पन्न कमवू शकणार आहेत.