file photo

अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यात पुन्हा एकदा प्रशासन सतर्क झाले आहे. यामुळे आता ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त दिसू लागला आहे. यातच आता नागरिकांची पोलिसांबरोबर हुज्जत घालण्याचे प्रकार देखील समोर येऊ लागले आहे.

करोना नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करणार्‍या पथकाशी व पोलीस निरीक्षकांबरोबर अरेरावी करून हुज्जत घालणार्‍या दोघा विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.हा प्रकार पाथर्डी तालुक्यात घडला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार शनिवार व रविवार पाथर्डी तालुक्यात संपूर्ण लॉकडाऊन पाळण्यात येतो.

करोनाचे नियम मोडणार्‍या विरोधात नगरपरिषद व पोलिसांनी संयुक्त कारवाईची मोहीम आखली. यावेळी शेवगाव रोड वरील मोरया बिल्डिंग समोर विना मास्क फिरणार्‍या दोघांना पोलिसांनी दंड भरण्यास सांगितला. मात्र, आम्ही आदेश मानत नाहीत,दंड भरणार नाही, तुम्हाला काय करायचे ते करा, असा वाद घालून पोलिसांशी अरेरावी करून हुज्जत घातली.

याप्रकरणी लक्ष्मण धोंडीराम पवार यांच्या फिर्यादीवरून संकेत लक्ष्मण बोरुडे व अक्षय लक्ष्मण बोरुडे यांच्याविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहा. पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत डांगे करत आहे.