Uddhav Thackeray: शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस प्रणित महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aaghadi Sarkar) सत्तेत आल्यानंतर सर्वप्रथम सरकारने राज्यातील शेतकरी बांधवांची (Farmer) कर्जमाफी केली. महात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना 2019 (Mahatma Phule Farmers Debt Waiver Scheme 2019) अंतर्गत महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली.

त्यावेळी महाविकास आघाडी सरकारने नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांना प्रोत्साहन म्हणून 50 हजारांची राशीं देण्याचा ऐतिहासिक निर्णय देखील घेतला. ज्या शेतकरी बांधवांनी कर्जाची नियमित फेड केली आहे अशा शेतकरी बांधवांना प्रोत्साहन म्हणून प्रोत्साहनपर राशी देण्यात येणार होती. मात्र मध्यंतरी कोरोना नामक संकटामुळे महाराष्ट्र शासनाच्या (Maharashtra Government) तिजोरीवर अतिरिक्त भार आला. यामुळे त्यावेळी पात्र शेतकऱ्यांना 50 हजार रुपये देणे शासनाला शक्य नव्हते. मात्र आता मायबापशासन शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर राशी देऊ इच्छित आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय देखील घेण्यात आला आहे. 2017 ते 20 या कालावधीत नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर राशी देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. अर्थातचं शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शासन एक जुलै अर्थात कृषी दिनाच्या दिवशी प्रोत्साहनपर राशी वाटप करण्यास सुरुवात करणार आहे.

दरम्यान राज्यात राजकीय अस्थिरता बघायला मिळत असून शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. शिवसेनेचे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) समवेत जवळपास चाळीस आमदार बंडाळी करून उठले आहेत. मात्र असे असताना देखील उद्धव ठाकरे सरकारने आपला वायदा पूर्ण करण्याचे ठरवले आहे. निश्चितच शासनाचा हा निर्णय शेतकऱ्यांसाठी दिलासा असून ठाकरे सरकारचे (Uddhav Thackeray) याबाबत कौतुक केले जात आहे.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, वर्ष 2017-18 या वर्षात शेतकरी बांधवांनी घेतलेले पीक कर्ज 30 जून 2018 पर्यंत पूर्णत: परतफेड केलेले असल्यास आणि 2018-19 या वर्षातील पीक कर्ज 30 जून 2019 पर्यंत पूर्णत: परतफेड केले असल्यास त्याचप्रमाणे 2019-20 या वर्षातील पीक कर्ज 31 ऑगस्ट 2020 पर्यंत पूर्णत: परतफेड केले असल्यास शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त 50 हजार रुपये प्रोत्साहनपर राशी देण्यात येणार आहे.

मात्र, 2019-20 या वर्षातील घेतलेल्या तसेच त्याची पूर्णत: परतफेड केलेल्या पीक कर्जाची रक्कम 50 हजारापेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष घेतलेल्या पीक कर्जाच्या मुद्दलाच्या रकमेइतका पैसा दिला जाणार आहे. मित्रांनो प्रोत्साहनपर राशीचा लाभ देताना वैयक्तिक शेतकरी विचारात घेतला जाणार आहे. शेतकऱ्यांनी एक किंवा अनेक बँकांकडून घेतलेल्या पीक कर्जाच्या परतफेडीची एकत्रित रक्कम यावेळी बघितली जाईल आणि मग 50 हजार रुपये या कमाल मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ संबंधित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात वर्ग करण्यात येणार आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना सरसकट 50 हजारांची प्रोत्साहनपर राशी देण्यात येणार नाही. यासाठी शासनाने काही निकष घालून दिले आहेत. या निकषाच्या अधीन राहून मायबाप शासन शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त पन्नास हजार रुपयांपर्यंतची मदत देणार आहे.