अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :-माजी शहराध्यक्ष कै. संतोष खेतमाळीस यांनी कोरोना काळात स्वतःचे तन मन धन झोकुन देऊन त्यांचे समाजसेवेचे व्रत राखले.

परंतु या काळात जनतेला मदत करत असताना त्यांना हि कोरोनाने गाठले व यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या जाण्याने भाजपा श्रीगोंदा शहराध्यक्ष हे पद रिक्त असल्यामुळे, त्या पदासाठी त्यांचे जवळचे सहकारी श्री. राजेंद्र बबनराव उकांडे यांच्या नावाची घोषणा तालुकाध्यक्ष संदिप नागवडे यांनी केली.

आमदार बबनरावजी पाचपुते यांच्या उपस्थितीत माऊली या त्यांच्या श्रीगोंदा येथील निवासस्थानी नियुक्तीचे पत्र देऊन नविन शहराध्यक्षांचा सत्कार व अभिनंदन करण्यात आले. या छोटेखानी कार्यक्रमात कै. संतोष खेतमाळीस यांना श्रधांजली वाहण्यात आली.

त्यावेळी आमदार पाचपुतें सह उपस्थित सर्वांनाच आश्रू अनावर झाले. यावेळी आमदार बबनरावजी पाचपुते, तालुकाध्यक्ष संदिप नागवडे, भगवानराव पाचपुते, पोपटराव खेतमाळीस, लक्ष्मणराव नलगे, लालासाहेब फाळके, नगरपालिकेचे नवनिर्वाचित उपनगराध्यक्षा सौ. मनिषा लांडे, बापुतात्या गोरे,

अशोक खेंडके, रमेश लाढाणे, सौ. वनिताताई क्षीरसागर, शहाजी खेतमाळीस, सौ. मनिषाताई वाळके, सौ. दिपालीताई औटी, सुनिताताई खेतमाळीस, संग्राम घोडके, सौ. ज्योतीताई खेडकर, छायाताई गोरे, महावीर पटवा, दिपक शिंदे,महेश क्षीरसागर यांसह मान्यवर उपस्थित होते.