Vegetable Farming : कारले चवीला कडू मात्र औषधी गुणधर्माचा खजिना आहे. कारले आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. विशेषत: मधुमेही रुग्णांसाठी हा रामबाण उपाय आहे. कारल्याचा रस बनवून पिला जातो तसेच कारले विविध भाज्या व इतर पदार्थ बनवण्यासाठी वापरले जाते.

खरं पाहता, कारले पिकाची लागवड (Bitter Gourd Farming) उन्हाळ्यातच केली जाते मात्र असे असली तरी त्याची लागवड संरक्षित शेती म्हणजेच पॉलिहाऊसमध्ये (Polyhouse Farming) केव्हाही शक्य आहे.

पॉलीहाऊसमध्ये योग्य तापमान आणि मातीची काळजी घेतल्यास कडाक्याच्या थंडीच्या काळातही चांगले उत्पादन मिळू शकते, ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न (Farmer Income) वाढेल. पॉलीहाऊसमध्ये ऑफ-सीझन कारल्याची (Bitter Gourd Crop) यशस्वी लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांनी (Farmer) काय लक्षात ठेवावे? याच महत्त्वपूर्ण गोष्टीविषयी आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कारल्याच्या लागवडीसाठी साधारणपणे उष्ण हवामान आवश्यक असते. उन्हाळ्यात तसेच पावसाळ्यातही याची लागवड करता येते. कारले पिकासाठी 25 ते 35 अंश सेंटीग्रेड तापमान चांगले मानले जाते. याच्या बियांच्या उगवणासाठी तापमान 22 ते 25 अंश असावे. हिवाळ्यात मोकळ्या शेतात कारल्याची लागवड करता येत नाही, परंतु शहरी भागातील आणि बाजाराजवळील गावातील शेतकरी हिवाळ्यातही पॉलिहाऊस तंत्राच्या सहाय्याने कारल्याची लागवड करू शकतात.

कारले लवकर नाश पावण्यास सुरुवात होते, त्यामुळे शेतकऱ्यांना बाजार जवळ असला तर कारली काढल्यानंतर लवकर विकू शकतात. मैदानी भागात, पॉलिहाऊस तंत्राचा वापर करून कारल्याच्या लागवडीसाठी सप्टेंबरमध्ये पेरणी केली जाते. त्याची लागवड बेड तयार करून केली जाते.

पॉलीहाऊसमध्ये शेतीची तयारी

पॉलिहाऊसमध्ये कारल्याच्या लागवडीसाठी प्रथम उंच आणि लांब बेड तयार करून सपाट केले जातात. त्यानंतर प्रति चौरस मीटरमध्ये 5 किलो शेणखत किंवा गांडूळ खत मिसळले जाते. तसेच 2-4 मिली फॉर्मल्डिहाइड किंवा दोन चमचे कार्बेन्डाझिम प्रति लिटर पाण्यात विरघळवून शेतात शिंपडले जाते आणि चांगले मिसळले जाते, त्यानंतर शेत दोन आठवडे प्लास्टिकने झाकले जाते. त्यामुळे जमिनीत कीड व रोगांचा धोका राहत नाही व पिकाचे चांगले उत्पादन मिळते.

पॉलीहाऊसमधील तापमान

कारल्याच्या चांगल्या उत्पादनासाठी पॉलिहाऊसचे तापमान दिवसा 20-30 अंश सेंटीग्रेड आणि रात्री 16-18 अंश सेंटीग्रेड ठेवावे. आर्द्रता 60-80 च्या दरम्यान असावे.

कारल्याची पेरणी

कारल्याच्या बिया तुम्ही थेट पॉलिहाऊसमध्ये बेड तयार करून पेरु शकता किंवा रोपवाटिकेत रोपे तयार केल्यानंतर पॉलिहाऊसमध्ये लावू शकता. रोपे तयार करण्यासाठी प्लॅस्टिक ट्रे, ज्याला प्रो ट्रे किंवा नर्सरी ट्रे असेही म्हणतात, त्यामध्ये बिया टाकून तयार करता येते किंवा लहान पॉलिथिन पिशव्यांमध्येही लागवड करता येते.

छाटणी आवश्यक आहे

पॉलिहाऊसमध्ये 15-20 दिवसांनी कारले पिकाची तळापासून छाटणी करणे आवश्यक आहे. सुरुवातीला, तळापासून एक किंवा दोन फ़ांद्या कापून टाका. नंतर मुख्य देठ किंवा फांदीला दोरी, सुतळी इत्यादी बांधून छताच्या दिशेने बांधा. कारले ही वेलवर्गीय वनस्पती आहे, त्यामुळे त्याला दोरीच्या साहाय्याने चांगले लटकवणे महत्त्वाचे आहे.

पीक किती दिवसात तयार होते

पॉलिहाऊसमध्ये पेरणीनंतर 55-60 दिवसांनी कारले काढणीसाठी तयार होते. पुढील काढणी 2-3 दिवसांच्या अंतराने करता येते, कारण कारले पीक लवकर परिपक्व होते.  तोडताना लक्षात ठेवा की फळे ओढून तोडू नका, तर धारदार चाकूने किंवा कात्रीने कापावीत, ओढल्याने झाडे तुटण्याची भीती असते.

खर्च आणि नफा

पॉलिहाऊसमध्ये कारले पिकाची हंगामात लागवड केल्यास सरासरी 100-120 क्विंटल प्रति 1000 चौरस मीटर उत्पन्न मिळते, जे 3 लाख ते 3.6 लाख रुपये कमवून देऊ शकते आणि खर्च वजा केल्यास 1.5 लाख ते 1.8 लाख निव्वळ नफा मिळू शकतो.