अहमदनगर Live24 टीम, 11 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुजय विखे पाटील यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची  दिल्ली येथे सहकुटुंब भेट घेतली.

कोविड काळात सरकारने केलेल्या विविध उपाययोजना आणि कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाबद्दल त्यांचे यावेळी आभार मानले.

सदर भेटीदरम्यान पंतप्रधान मोदीनी खा. सुजय विखे पाटील यांची मुलगी कु. अनिषा सोबतही दिलखुलासपणे संवाद साधला.याप्रसंगी आमदार श्री. राधाकृष्ण विखे पाटील आणि खा.विखे यांच्या पत्नी धनश्री विखे पाटील देखील उपस्थित होत्या. 

या भेटीचे फोटो खा. सुजय विखे यांच्या सह आमदार राधाकृष्ण विखे यांनी ही सोशल मिडीयावर शेअर केले आहेत .

आमदार विखे पाटील त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणाले ”देशात प्रथमच सहकार मंत्रालय स्थापन केल्याबद्दल माननीय पंतप्रधानांचा सत्कार करून आभार मानले.

जनसेवा फौंडेशनच्या माध्यमातून बचतगटातील महिलांनी फुलांपासून तयार केलेल्या अगरबती उत्पादनाच्या उपक्रमाची माहीती सौ. धनश्री विखे पाटील यांनी पंतप्रधानाना दिली.