file photo

अहमदनगर Live24 टीम, 25 जुलै 2021 :-  कोपरगाव विधानसभा मतदार संघाचा लोकप्रतिनिधी म्हणून जो न्याय कोपरगाव तालुक्यातील गावांना दिला जाईल.

तोच न्याय राहाता तालुक्यातील जी गावे कोपरगाव मतदार संघाला जोडली आहेत, त्या गावांना देणार असून ही अकरा गावे देखील विकासाच्या रडारवर आहेत, असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी राहाता तालुक्यातील नपावाडी येथे एका कार्यक्रम प्रसंगी केले.

कोपरगाव मतदारसंघातील नपावाडी (ता. राहाता) येथे विविध विकासकामांचे लोकार्पण आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,

गौतम बँकेचे अध्यक्ष बाबासाहेब कोते, जिनिंग प्रेसिंगचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार, रामभाऊ जाधव, सरपंच ज्ञानदेव साळुंके, उपसरपंच दत्तात्रय जाधव, एलमवाडीचे सरपंच शिवाजी साबदे, उपसरपंच कल्पना चौधरी,

बाजार समितीचे संचालक यशवंत चौधरी, गणेश कारखान्याचे संचालक बाळासाहेब चौधरी, माजी सरपंच अशोकराव धनवटे, राजेंद्र धनवटे, रामकृष्ण वहाडणे, दिलीप चौधरी, गोपीनाथ चौधरी, महेश औताडे, गणेश थोरमोटे, पंडित चौधरी, विकास उगले, दीपक वहाडणे आदी उपस्थित होते.