अहमदनगर Live24 टीम, 9 ऑगस्ट 2021 :- जम्मू -काश्मीरच्या अनंतनाग इथून एक देशाला हादरवारी बातमी समोर आलीय,इथे दहशतवादी हल्ला झाल्याची बातमी समोर येत आहे. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी स्थानिक भाजप नेते गुलाम रसूल दार आणि त्यांच्या पत्नीवर गोळीबार केला. दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र तेथे त्यांचा मृत्यू झाला आहे.

याआधी देखील दहशतवाद्यांनी भाजपला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता. गुलाम रसूल डार कुलगाम इथले भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष होते. भाजप पदाधिकारी व्यतिरिक्त सरपंचही होते. त्यांच्या पत्नीलाही दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या आहेत. या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली आहे.

सरपंच आणि त्यांच्या पत्नीवर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर त्यांना तातडीनं उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारा दरम्यान दोघांचाही मृत्यू झाला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दक्षिणी कश्मीरच्या अनंतनाग परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला.

दहशतवाद्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले होते. त्यांना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं. मात्र त्यांचा मृत्यू झाला होता. PDP अध्यक्ष महबूबा मुफ्ती यांनी ट्वीट करत घडलेल्या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. निष्पाप लोकांवर हल्ला करणे आणि त्यांची हत्या करणे हे दहशतवाद्यांची निराशा दर्शवते.

ठाकूर यांनी शोक व्यक्त केला आहे. हल्लेखोरांना पकडण्यासाठी आणि त्यांना शक्य तितकी कठोर शिक्षा देण्याचे आवाहन अल्ताफ ठाकूर यांनी पोलिसांना केले आहे. दरम्यान जम्मू काश्मीरमधून ३७० आणि ३५ ए कलम हटवण्याचा दिवस ५ ऑगस्ट तारीख नुकतीच निघून गेली.

राज्याची दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये पुनर्रचना करण्यात आली. त्यामुळे या दहशतवादी हल्ल्याचा संबंध याच्याशी जोडला जात आहे.