कौतुकास्पद ! अदानी समूहात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने अदानीकडून प्रेरणा घेत गरजू शेतकऱ्यांना केली ‘ही’ मदत ; अख्ख्या महाराष्ट्रात रंगली चर्चा

Gautam Adani : आपण नेहमी म्हणतो की आपल्यापेक्षा वडील-धाडील व्यक्ती किंवा श्रेष्ठ व्यक्ती जस वागतो तसंच अनुकरण लहानग्यांकडून केलं जातं. आता याचं जिवंत उदाहरण समोर आलं आहे. अदानी समूहाचे मालक यांनी देणगी देण्याचे घोषणा केल्यानंतर त्यांच्या समूहात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने देखील आपल्या परीने जेवढी होऊ शकेल तेवढी मदत शेतकऱ्यांना केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

यामुळे सध्या अदानी समूहाचे मालक गौतम अदानी आणि हा कर्मचारी सर्वत्र कौतुकास पात्र ठरले आहेत. भारतीय उद्योजक आणि आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांनी नुकतेच आपल्या वाढदिवसानिमित्त देणगी देणार असल्याचे सांगितले होते.

अदानी यांनी आपण साठ हजार कोटी रुपयांची देणगी देणार असल्याचे सांगितले होते. आता मालकच दानशूर म्हटल्यानंतर कर्मचारी पण दानशूरच असणार. आपल्या मालकाकडून प्रेरणा घेत अदानी समूहाच्या डहाणू येथील थर्मल पावर स्टेशन मधील कर्मचारी जिग्नेश बारी यांनी गरजू शेतकऱ्यांना मदत म्हणून बियाणं वाटप केल आहे.

Advertisement

जिग्नेश यांनी 50 किलो बियाणे वाटप केलं असून यामुळे संबंधित शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. जिग्नेशने केलेलं काम छोटं मात्र अनेकांना प्रेरणा देणार आहे. तसेच अदानी यांनी देणगीची केलेली घोषणा किती दुरगामी आणि प्रभावशाली आहे याचे हे उदाहरण.

जिग्नेश आदिवासी बहुल क्षत्रातून येतात. तेथील शेतकऱ्यांच्या अडीअडचणी त्यांना चांगल्याच ठाऊक आहेत. त्यामुळे ते आपल्या भागातील आदिवासीना मदत करण्यासाठी कायमच पुढे सरसावत असतात. दरम्यान आता ते ज्या संस्थेसाठी काम करतात त्या अदाणी समूहांच्या मालकाने साठ हजार कोटी रुपयांची देणगी देण्याची घोषणा केल्यानंतर त्यांनीदेखील यातून प्रेरणा घेत स्थानिक गरजू शेतकऱ्यांना 50 किलो बियाणे वाटप करण्याचा निर्णय घेतला आणि बियाणे वाटप केला आहे.

जिग्नेश यांनी सांगितल्याप्रमाणे अदानी यांच्याकडून आरोग्य, शिक्षण आणि कौशल्य विकास यांसारख्या क्षेत्रात मोठी मोलाची मदत मिळत आहे. यातून नवीन भारत उभा राहत आहे. ते अनेकांसाठी प्रेरणास्त्रोत असून जिग्नेशसाठी देखील प्रेरणास्रोत आहेत.

Advertisement

त्यांचेच प्रेरणा घेऊन जिग्नेश यांनी 10 आदिवासी कुटुंबांना 50 किलो बियाणे वाटप केलं. त्यांनी दिलेल्या बियाणातून चार हजार किलो धान्याचे उत्पादन झाले असून संबंधित शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला. या आदिवासी शेतकरी कुटुंबांच्या चेहऱ्यावरील आनंद त्यांच्यासाठी अधिक मोलाच असल्याचे त्यांनी सांगितलं.