अहमदनगर Live24 टीम, 26 जुलै 2021 :- राहुरी तालुक्यातील वांबोरी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या दारासमोर लावलेल्या दोन दुचाक्या मंगळवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या.

या दुचाकी चोरांचा राहुरी चे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वांबोरी पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत चोरट्यांच्या या टोळीच्या काही तासातच मुसक्या आवळल्या असून परिसरातून वांबोरी पोलिसांचे मोठे कौतुक होत आहे.

तसेच या टोळीकडून आणखी काही चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. मंगळवारी रात्री पोलीस हवालदार दिनकर चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल रमेश शिंदे,

पोलीस मित्र गोरक्षनाथ दुधाडे व हरीच्छंद्रे होमगार्ड हे गस्त घालत असताना बाजारपेठेतील गांधी चौक परिसरामध्ये दोन तरूण संशयास्पदरित्या फिरताना आढळून आले या दोन्ही युवकांना गस्ती पथकाने हटकले व त्यांची विचारपूस केली समाधान कारक उत्तरे न मिळाल्याने चव्हाण व शिंदे यांनी त्यांचे मोबाईल नंबर घेतला तसेच त्यांचे फोटो मोबाईल मध्ये काढले.

दरम्यान अर्ध्या तासातच प्रसाद प्रविण धावडे यांची दुचाकी क्रमांक एम. एच. 14 एक्यू 67 55 चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली त्यानंर लगेचच किराणा व्यवसायिक संदीप रामगोपाल झंवर यांनी आपल्या दुकानासमोरील दुचाकी क्रमांक एम.एच 17 ए.बी 5177 ही चोरीला गेली.

सदर चोरट्यांचा शोध सुरू करताना परिसरातील सी सी टिव्ही कॅमेरे चेक करण्यात आले त्यात काही वेळापुर्वी बाजारपेठेत फिरत असलेले दोन युवक दिसून आले तात्काळ त्यांचा शोध घेतला असता गुंगारा देऊन पलायन करण्यात ते यशस्वी झाले होते.

परंतु सकाळी पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ व पोलीस उपनिरीक्षक निलेश कुमार वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली त्या दोन संशयितचोरट्यांचा शोध संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुरू केली काही वेळातच संशयित आरोपींचा शोध लागला मुद्देमाल व चोरटे यांच्यापर्यंत मुक्त खबऱ्यामार्फत पोलीस पोहोचले असतानाच

गुरुवारी पहाटेच्या सुमारास गाढ झोपेत असलेल्या दोन्ही चोरट्यांना पोलीस हवालदार दिनकर चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल रमेश शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल संतोष राठोड, पोलीस कॉन्स्टेबल पारखे यांच्या पथकाने ताब्यात घेतले.

यामुळे वांबोरी पोलिसांची कर्तव्य दक्षता व चाणाक्षतेमुळे मोठी चोरी उघडकीस आली. यामुळे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, पोलीस उपनिरीक्षक निलेशकुमार वाघ,

हवलदार दिनकर चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल संतोष राठोड पोलीस कॉन्स्टेबल संतोष रमेश शिंदे पोलीस कॉन्स्टेबल पाखरे यांचे विशेष कौतुक होत होत आहे