अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :- रतीय हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेने 31 जुलैपर्यंतचा हवामानाचा अंदाज जारी केला आहे. राज्यात येत्या शुक्रवारी आणि शनिवारी पावसाचा जोर वाढेल, असं हवामान विभागाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.

महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात दाणादाण उडवणाऱ्या पावसानं सध्या उसंत घेतली आहे. मात्र, भारतीय हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेने 31 जुलैपर्यंतचा हवामानाचा अंदाज जारी केला आहे.

राज्यात येत्या शुक्रवारी आणि शनिवारी पावसाचा जोर वाढेल, असं हवामान विभागाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. संपूर्ण कोकण, मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात पाऊस वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

हवामान विभागानं 31 जुलैपर्यंतचा हवामानाचा अंदाज जारी करताना विविध जिल्ह्यांना ऑरेंज अ‌लर्ट, यलो अ‌लर्ट जारी केले आहेत. तर, कोणत्याही जिल्ह्यांना रेड अ‌ॅलर्ट देण्यात आलेला नाही.

28 जुलै रोजी हवामान विभागानं रायगड, रत्नागिरी, सातारा आणि पुणे जिल्ह्याला यलो अ‌ॅलर्ट दिला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. तर 29 जुलै रोजी ठाणे, रायगड, सिंधुदर्ग, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.